30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeक्रिकेटIND vs NZ : भारतानं न्यूझीलंडला हरवत जिकलं ‘मोठं’ बक्षीस

IND vs NZ : भारतानं न्यूझीलंडला हरवत जिकलं ‘मोठं’ बक्षीस

टीम लय भारी

मुंबई: मुंबईतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव करत दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली(India beat New Zealand to win ‘big’ prize )

५४० धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात १६७ धावांत आटोपला. भारताने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ६२ धावांवर गारद झाला.

“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय” (भाग २)

“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय”

भारताने आपला दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित केला. दोन्ही संघांमध्ये कानपूर येथे खेळलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. हा सामना शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत गेला आणि भारत एका विकेटने विजयापासून दूर होता.

मुंबई कसोटीतील विजयासह टीम इंडिया कसोटी क्रिकेटमधील नंबर वन संघ बनला आहे. त्यांनी न्यूझीलंडकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले. किवी संघाने जून २०२१ मध्ये भारताकडून हा दर्जा हिरावून घेतला होता आणि त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून आपले स्थान पक्के केले होते.

डेविड वॉर्नरला मिळालेल्या ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ किताबावर, शोएब अख्तरची नाराजी

India vs New Zealand: Virat Kohli Registers Yet Another Record In International Cricket

पण आता टीम इंडियाने वळण घेतले आहे. आयसीसीकडून याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. आयसीसी दर बुधवारी आपली क्रमवारी अपडेट करते. त्यानंतरच क्रमवारीतील बदल दिसून येतो. भारताने कानपूर कसोटी जिंकली असती, तरी त्यांनी पहिला क्रमांक पटकावला असता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिका सुरू झाली, तेव्हा न्यूझीलंड १२६ रेटिंगसह पहिल्या स्थानावर होता. त्याच वेळी भारताचे ११९ रेटिंग गुण होते. कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्याने किवी संघाला या मालिकेत फायदा झाला, मात्र रेटिंगमध्ये तोटा झाला.

मुंबई कसोटीतील पराभवानंतर त्याच्या नंबर वन राहण्याच्या आशा संपल्या होत्या. ऑस्ट्रेलिया सध्या १०८ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि इंग्लंड १०७ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. या दोघांपैकी जो कोणी अॅशेस मालिका जिंकेल तो क्रमवारीत वर येईल.

२००९ मध्ये भारत पहिल्यांदाच कसोटीत नंबर वन बनला होता. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने हे यश मिळवले. यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटीत वेगळे स्थान मिळवले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत सतत अव्वल स्थानावर आहे आणि आपले स्थान मजबूत करत आहे.

कोहलीचाही पराक्रम

खेळाडू म्हणून विराट कोहलीचा हा कसोटीतील ५० वा विजय आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० विजय नोंदवणारा कोहली जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

महेंद्रसिंह धोनी आणि ऑस्ट्रेलियाचे रिकी पाँटिंगही हे करू शकले नाहीत. कसोटीबद्दल बोलायचे झाले तर पाँटिंगने एक खेळाडू म्हणून १०८ सामने जिंकले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६२ सामने जिंकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

पण त्याला टी-२० मध्ये फक्त ७ सामने जिंकता आले आहेत.विराट कोहलीबद्दल बोलायचे, तर त्याने एक खेळाडू म्हणून कसोटीत ५० सामने, एकदिवसीयमध्ये १५३ आणि टी-२० मध्ये ५० सामने जिंकले आहेत. म्हणजेच त्याला तिन्ही फॉरमॅटचा राजा म्हणता येईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी