30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजICG Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांवर भरती

ICG Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांवर भरती

टीम लय भारी

नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दल (Indian Cost Guard recruitment 2021) म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये असिस्टंट कमांडंटसाठी (Assistant Commandant) 50 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे(Indian Coast Guard: Recruitment process for 50 posts)

देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे.

“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय”

एक पुस्तक लिहिणार असून त्यामध्ये त्या ‘शपथविधीच्या’ सर्व घटना उघड करणार – देवेंद्र फडणवीस

भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण 50 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 6 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार असिस्टंट कमाडंट या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या https://joinindiancoastguard.cdac.in/ या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत 6 डिसेंबर ते 17 डिसेंबरच्याच्या दरम्यान आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करु शकतात. इंडियन कोस्टगार्डच्या माहितीनुसार एकूण असिस्टंट कमाडंटच्या 50 पदांवर भरती होणार आहे.

मुंबई आयआयटीचे माजी विद्यार्थी पराग अग्रवाल ट्विटरचे CEO

Two merchant vessels collide near Gulf of Kutch, no casualty or oil spill reported: ICG

मध्ये जनरल ड्युटीसाठी 30 जागा भरल्या जातील यामध्ये 12 जागा खुल्या, ईडबल्यूएससाठी 1, ओबीसीसाठी 6 , एससीसाठी 05 आणि एसटीसाठी 16 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर, टेक्निकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी 10 जागांवर भरती होणार आहे. तर, कमर्शियल पायलट एन्ट्रीसाठी 10 जागा निश्चित असतील.

शैक्षणिक पात्रता

इंडियन कोस्टगार्डमध्ये जनरल ड्युटी पदावर अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावेत. मात्र, बारावीला विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्ज्ञ विषयासह 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असावेत.

टेक्निकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिल्पोमा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्री अँड प्रोडक्शन, आटोमोटिव्ह, किंवा मरिन आकर्किटेक्चर यामधील पदवी उत्तीर्ण झालेले असावेत.

तर, कमर्शियल पायल एनट्रीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 60 टक्के गुणांसह फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयासह 12 वी उत्तीर्ण असावा. त्याच्याकडे डीजीसीएचं कमर्शियल पायलट लायसन्स असावं. अर्ज करण्यपूर्वी उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन पाहणं आवश्यक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी