36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeटेक्नॉलॉजीजिओनं पुन्हा लॉन्च केले पाच नवे प्लान; ग्राहकांना होणार फायदा

जिओनं पुन्हा लॉन्च केले पाच नवे प्लान; ग्राहकांना होणार फायदा

टीम लय भारी

 मुंबई: एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड प्लान २० टक्क्यांनी वाढवले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली होती. रिलायन्सने जिओ फोनच्या ७५ रुपयाचा प्लानचा अवधी कमी केला आहे(Jio has re-launched five new plans)

त्याचबरोबर अन्य प्रीपेड प्लानमध्ये ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवे दर १ डिसेंबरपासून लागू झाले आहेत. नव्या अपडेटनंतर जिओने आपल्या प्लानमधून ओटीटी काढलं होतं.

Samsung ने भारतात लॉंच केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फिचर्स !

MPSC : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची जाहिरात प्रसिद्ध, 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

मात्र आता रिलांयन्स जिओ ग्राहकांसाठी पाच नवे प्लान आणले आहेत. डिस्ने हॉटस्टॉरसह (Disney+Hotstar) जिओ प्लान आणला आहे. जिओने डिस्ने हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह योजना पुन्हा सादर केली आहे, परंतु किंमत वाढवली आहे.

जिओ आता डिस्ने + हॉटस्टार (Disney+Hotstar) सबस्क्रिप्शन ६०१ रुपयांच्या प्लॅनसह देत आहे. हा प्लॅन आधी ४९९ रुपयांचा होता. या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेसह ३ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज मिळतील. डिस्ने हॉटस्टार प्लॅनसह १ वर्षासाठी सदस्यता घेतली जाईल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ६जीबी अतिरिक्त डेटा देखील मिळेल.

इरफान खानला २ वर्षांपूर्वीच लागलेली मृत्यूची चाहूल; नसीरुद्दीन शाह यांचा खुलासा

Why Are FMCG Distributors in India Threatening to Halt Supplies from 2022?

७९९ रुपयांचा आणखी दुसरा प्लान आहे. या प्लानची किंमत पूर्वी ६६६ रुपये होती. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. यासोबतच अमर्यादित कॉलिंग, जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन आणि दररोज १०० एसएमएस उपलब्ध असतील. या प्लॅनची वैधता ५६ दिवसांची आहे.

एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनसह येणार्‍या तिसरा प्लान १,०६६ रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानची किंमत आधी ८८८ रुपये होती. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त ५ जीबी डेटा मिळणार आहे.

 चौथा प्लान ३,१९९ रुपयांचा आहे. जिओच्या प्लॅनची किंमत आधी २,५९९ रुपये होती. डिस्ने हॉटस्टार सबस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये एक वर्षासाठी उपलब्ध असेल. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये एकूण ७३० जीबी डेटा आणि १० जीबी अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे.

६५९ चा प्लॅन हा शेवटचा प्लान एक क्रिकेट पॅक आहे. यामध्ये दररोज १,५ जीबी डेटा मिळणार आहे. यासोबतच डिस्ने हॉटस्टार सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी उपलब्ध असेल. या प्लानची किंमत आधी ५४९ रुपये होती. यात अमर्यादित कॉलिंग नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी