30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeटॉप न्यूजमहार रेजिमेंटच्या सैनिकांना 'जय भीम' म्हणण्यास बंदी, जितेंद्र आव्हाडांनी केंद्रावर साधला निशाणा

महार रेजिमेंटच्या सैनिकांना ‘जय भीम’ म्हणण्यास बंदी, जितेंद्र आव्हाडांनी केंद्रावर साधला निशाणा

टीम लय भारी

मुंबई : आमदार  डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या एका पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतं आहे. चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून  महाड चवदार तळे, रायगड येथे गेलो होते. त्यावेळी त्यांनी महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांची भेट घेतली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी, संगीतले की, आता आम्हाला, “जय भीम” घोषणा देता येत नाही, हा प्रकार ऐकून आमदार जितेंद्र आव्हाड तीव्र संताप झाला. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून महार रेजिमेंट ची स्थापना केली.

“जय भिम” ही घोषणा ब्रीदवाक्य म्हणून ठेवल्या गेली.त्या घोषणेला विरोध का असा प्रश्न मला त्याठिकाणी पडला. “जय भिम” हा कुठल्या एका जातीचा नारा नाही, “जय भिम” हा इथल्या क्रांतिकारी ऊर्जेचा नारा आहे, असं म्हणतं त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

या पोस्ट मध्ये त्यांनी महार रेजिमेंटचा इतिहास सांगितला. आपल्या पोस्ट मध्ये ते म्हणतात की,भारतीय सैन्य दलात 30 च्या जवळपास सैन्यदल आहेत. त्यापैकी महार रेजिमेंट ही सर्वात ही फार पूर्वीची आणि ऐतिहासिक अशी रेजिमेंट आहे. ही रेजिमेंट स्थापन करत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नातुन महार रेजिमेंटची स्थापना झाली. जुलै 1941 मध्ये महार रेजिमेंट विषयीचा शेवटचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि त्या नंतर तत्कालीन ब्रिटिश सरकारने सप्टेंबर 1941 मध्ये या विषयीचे आदेश काढून एका महिन्याच्या अवधीतच महार रेजिमेंट स्थापन झाली.

महार जातीच्या इतिहासाची आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाची फार मोठी परंपरा आहे. या लढावय्या जातीला, त्यांच्या पराक्रमामुळे इतिहास घडवता आला. त्यामध्ये भिमा कोरेगावचा विजयी स्तंभ देखील आपल्याला याची साक्ष देते.समता,स्वातंत्र्य, बंधुतब आणि न्याय यासाठी महार रेजिमेंटने ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता संघर्ष केला. हा एक इतिहास आहे.”जय भीम” घोषणा देता येत नाही, हा प्रकार ऐकून मला तीव्र संताप झाला.

ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून महार रेजिमेंट ची स्थापना केली. “जय भिम” ही घोषणा ब्रीदवाक्य म्हणून ठेवल्या गेली. त्या घोषणेला विरोध का असा प्रश्न मला त्याठिकाणी पडला असं त्यांनी म्हटलं आहे. “जय भिम” हा कुठल्या एका जातीचा नारा नाही, “जय भिम” हा इथल्या क्रांतिकारी ऊर्जेचा नारा आहे. त्यावर तुम्ही महार रेजिमेंटच्या सैनिकांना तो नारा देण्यापासून का अडवत आहात आणि बंदी का आणली हा प्रश्न आम्ही केंद्रीय सरंक्षण मंत्रालय व लष्कर प्रमुखाला विचारणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी