31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeएज्युकेशनअल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये शिष्यवृत्ती ; सुधीर तांबे यांची मागणी

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये शिष्यवृत्ती ; सुधीर तांबे यांची मागणी

टीम लय भारी

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. परंतु सरत्या आठवड्यात आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधानपरिषदेत अल्पसंख्यांक, आदिवासी समाज सक्षम व्हावा यासाठी शिष्यवृत्तीची मागणी केली आहे. कारण या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्वपूर्ण साधन आहे. या समाजातील विद्यार्थ्यांना सध्या मिळत असलेली शिष्यवृत्ती ही अत्यंत तुटपुंजी असून, त्यामध्ये भरीव वाढ होणे गरजेचे आहे ( Sudhir Tambe demanded scholarship increased for Minority students )

त्याकरता सध्या असलेल्या पंचवीस हजार रुपये शिष्यवृत्ती दुप्पट वाढ होऊन त्यांना पन्नास हजार रुपये शिष्यवृत्ती मिळावी अशी आग्रही मागणी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली असून या मागणीला सरकारकडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे ( Sudhir Tambe raised issue of Minority students ).

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती ही अत्यंत तुटपुंजी

मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत अल्पसंख्यांक विद्यार्थी आणि शिक्षण विभागातील विविध प्रश्नांबाबत मागणी करताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की ( Sudhir Tambe at Maharashtra Assembly ), समाजाच्या विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण  हे अत्यंत महत्त्वपूर्ण माध्यम आहे. म्हणून शिक्षण क्षेत्रावरील खर्च ही सरकारने वाढवला पाहिजे. सध्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती ही अत्यंत तुटपुंजी आहे. त्यातून उच्च शिक्षणासाठी किंवा इतर शिक्षणासाठी त्यांना अडचणीचे ठरते. याकरता या शिष्यवृत्तीमध्ये शासनाने भरीव वाढ केली पाहिजे. सध्या या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असून यापुढे ती दुप्पट म्हणजे 50 हजार रुपये करावी.

हे सुद्धा वाचा

सत्यजित तांबे यांचा पुढाकार, युवक कॉंग्रेसने केले वृक्षारोपण

सहकारातील संत – स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात

डॉ. सुधीर तांबे यांची हॅट्रीक

तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रभावी उपाय योजना कराव्यात. विविध संस्थांचे अनुदानही बंद होते ते ही तातडीने सुरू करावे. अशी मागणी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सरकारकडे केली ( Sudhir Tambe raised star question).

यावर अल्पसंख्यांक राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आमदार डॉ. तांबे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये दुपटीने म्हणजे पन्नास हजार रुपये वाढ करण्याचे तत्वतः मान्य केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील गोरगरीब आदिवासी, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून

या मागणीबद्दल आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर यांसह राज्यभरातून विविध विद्यार्थी व पालक संघटनांनी अभिनंदन केले आहे.

देवेंद्र फडणविसांच्या घाणेरड्या सवयी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी