33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात काही पक्ष धार्मिक व जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात :...

राज्यात काही पक्ष धार्मिक व जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात : रोहित पवार

टीम लय भारी 

मुंबई:  आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट माध्यातून धार्मिक वादावर भाष्य केले आहे. रोहित पवार (Rohit Pawar) म्हणतात की, कोरोनाच्या काळात म्हणजेच मागच्या वर्षी सर्व धार्मिक स्थळं बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरुन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन, बेड, औषधं यांसाठी हातात हात घालून लढत होतो.

आपली माणुसकी जिंकली आणि आपण त्या संकटाला परतून लावलं. पण आज राज्यात पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत. कुणाला वाटंत असेल ही माणुसकी विसरली जाईल आणि आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचं कमळ फुलेल किंवा काहींना वाटंत असेल आपली राजकीय भाकरी भाजेल, पण महाराष्ट्रात ते शक्य नाही आणि आपली संस्कृतीही तसं होऊ देणार नाही.

फक्त मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा कोळसा होणार नाही आणि द्वेषाच्या चिखलात एकात्मतेचा पाय फसणार नाही याची दक्षता घ्यावी! त्यांनी नाव न घेता विरोधी पक्षावर टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात मशिदींच्या भोंगवर राजकारण होतं आहे.

हे सुद्धा वाचा: 

आमदार रोहित पवार रमले पुस्तकांमध्ये

MPs arrive to meet Sharad Pawar, BJP leaders also included

राजू शेट्टी ‘महाविकास आघाडी’तून नक्की का बाहेर पडले ते समजत नाही:जयंत पाटील Raju shetty jayant patil

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी