32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयकेंद्र सरकारच्या भाजपच्या भ्रष्टाचाराकडे किरीट सोमय्या चे लक्ष नाही, हेमंत पाटील

केंद्र सरकारच्या भाजपच्या भ्रष्टाचाराकडे किरीट सोमय्या चे लक्ष नाही, हेमंत पाटील

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई  : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मोठा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे असे सांगत असणाऱ्या किरीट सोमय्या यांना केंद्रसरकार आता भाजपसरकार मधील भ्रष्टाचार दिसत नाही का?, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी केली आहे.(Kirit Somaiya is not paying attention to BJP’s corruption, Hemant Patil)

 महसूल व वने, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग,बदली व पदोन्नती,महाराष्ट्र विद्युत महामंडळा, मुख्यमंत्री सडक योजना,पंतप्रधान सडक योजना,पाटबंधारे विभाग,नोंदणी व महानिरीक्षण ,कोविड आपली  वस्थापन,शालेय विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषदा व महानगर पालिका अशा अनेक विभागात भ्रष्टाचार होताना दिसून येत आहे पण केंद्र सरकार मधील भ्रष्टाचार किरीट सोमय्या यांना का दिसत नाही असा सवाल हेमंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांना केला.

 राज्य सरकार विरोधात केंद्र सरकार असे राजकारण चालू आहे महाविकास आघाडीचे नेते व मंञी पोलीस यंत्रणेचा माध्यमातून व भाजपाचे नेते व मंञी ई डी,सी बी आय व ए एन आय व केंद्रातील विभागामार्फत एकमेकाना ञास देत उनी धुनी काढणाचे  चालू आहे यात सर्व सामान्याणी काय बोध घावा,  असे हेमंत पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुंबई महापालिकेने उंदीर मारण्यातही केला घोटाळा, प्रभाकर शिंदेंचा आरोप

आता गाठ माझ्याशी! भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक

शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता,किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप

‘Attack’ on Kirit Somaiya: BJP demands action against Pune Police

 भाजप चे नेते किरीट सोमय्या यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडी विरोधात बोलायला सांगितले आहे. महाविकास आघाडी व भाजप सरकार हे लोकांची दिशाभूल करून गैरसमज पसरवून निवडणुकीत मतदानाची झोली भरून सत्ता स्थापन करण्याचा नादात असल्याचे दिसून येत आहे परंतू राज्यातील व देशातील भ्रष्टाचार कसा कमी करता येईल व त्यावर कसे नियंत्रण ठेवता येईल याबाबत पोलीस काहीच बोलत नसल्याची खंत हेमंत पाटील यांनी बोलुन दाखवली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी