38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजशेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेपासून नियम बदलणार

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेपासून नियम बदलणार

टीम लय भारी

नवी दिल्लीः बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने T+1 (ट्रेड+1 दिवस) सेटलमेंट सायकलच्या अंमलबजावणीसाठी अंतिम मुदत वाढवलीय. हे सेटलमेंट सायकल आता 25 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहे. शेअर बाजार आणि त्यातील गुंतवणूकदारांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. यापूर्वी सेबीचा हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार होता. तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला शेअर बाजारातील बाजार भांडवलानुसार तळातील 100 समभागांची निवड करण्यात आली (stock market investors have important news).

मार्चपासून त्यात 500-500 शेअर्स जोडले जातील. सप्टेंबरमध्ये जेव्हा SEBI ने हा नवीन नियम लागू केला, तेव्हा त्याने तो पर्यायी ठेवला आणि स्टॉक एक्सचेंजसाठी अनिवार्य नाही. पण आता SEBI ने स्पष्ट केले की, सुरुवातीला तळाच्या 100 समभागांचा यात समावेश केला जाईल. यामुळे एक्सचेंजेसला 25 फेब्रुवारीपासून हा नवीन नियम लागू करणे बंधनकारक करण्यात आलेय.

SBI कडून दुचाकी कर्ज ‘SBI Easy Ride’ लाँच, YONO वर मिळणार एवढा कर्ज

फाटलेल्या नोटा बदलून देण्यास बँकेने नकार दिल्यास कारवाई होऊ शकते, पाहा हे आहेत नियम

मुदत वाढवून देण्याची मागणी

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (FPIs) चे कस्टोडियन त्याची मुदत वाढवण्याची मागणी करत होते. एवढ्या कमी कालावधीत हा नियम लागू करणे आपल्याला शक्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेतही जेव्हा हा नियम लागू झाला तेव्हा जास्त वेळ देण्यात आला. सेबीने सप्टेंबरमध्ये या नियमात बदल करण्याची घोषणा केली होती. तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास सध्या भारतात सर्व इक्विटी/स्टॉक सेटलमेंट T+2 च्या आधारावर केले जाते. जेव्हा तुम्ही शेअर्स विकता तेव्हा तो शेअर लगेच ब्लॉक केला जातो आणि तुम्हाला T+2 दिवशी रक्कम मिळते. इथून T म्हणजे व्यापार आहे.

T+1 सेटलमेंटचा नवीन नियम काय?

SEBI च्या नवीन परिपत्रकानुसार, कोणतेही स्टॉक एक्सचेंज सर्व भागधारकांसाठी कोणत्याही शेअरसाठी T+1 सेटलमेंट सायकल निवडू शकते. मात्र, सेटलमेंट सायकल बदलण्यासाठी किमान एक महिन्याची नोटीस द्यावी लागेल. SEBI ने असेही म्हटले आहे की, एकदा स्टॉक एक्सचेंजने कोणत्याही स्टॉकसाठी T+1 सेटलमेंट सायकल निवडली की, ते किमान 6 महिने सुरू ठेवावे लागेल. स्टॉक एक्स्चेंजला या दरम्यान T+2 सेटलमेंट सायकलची निवड करायची असल्यास त्याला एक महिन्याची अगोदर सूचना द्यावी लागेल.

औरंगाबादेत चोरट्यांची दिवाळी, दहा घरे फोडली

Market LIVE Updates: Sensex, Nifty trade flat; Tata Motors top gainer, midcaps outshine

स्टॉक एक्स्चेंजवरील सर्व प्रकारच्या व्यवहारांना हे लागू होणार

SEBI ने स्पष्ट केले आहे की, T+1 आणि T+2 मध्ये कोणताही फरक केला जाणार नाही. स्टॉक एक्स्चेंजवरील सर्व प्रकारच्या व्यवहारांना हे लागू होईल. ऑगस्ट 2021 च्या सुरुवातीला SEBI ने विद्यमान T+2 सायकल T+1 सायकलने बदलण्याच्या प्रक्रियेतील अडचणींबद्दल अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञांचे एक पॅनेल तयार केले होते. त्याआधी देशात T+3 सेटलमेंट सायकल चालू होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी