29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र'त्या' २५ बलात्काऱ्यांची नावं गर्भारपणात पोटावर लिहून विवस्त्र फिरत होती...

‘त्या’ २५ बलात्काऱ्यांची नावं गर्भारपणात पोटावर लिहून विवस्त्र फिरत होती…

वासना थंड करण्यासाठी ज्या गिधाडांनी आपल्या शरीराचे लचके तोडले त्या २५ बलात्काऱ्यांची नावे पोटावर लिहून ती असहाय्य पीडित महिला सहा महिन्यांच्या गर्भारपणात रस्त्यावर हिंडत होती... संपूर्ण पुरुष जातीला शिव्यांची लाखोली वाहत... अहमदनगरच्या शिंगवे नाईक येथील माउलीसेवा प्रतिष्ठानच्या मनगाव प्रकल्पातील मनोविकलांग महिलेची ही करुण कहाणी...

‘आई’ होण्याचा क्षण हा प्रत्येक स्त्रीसाठी परमोच्च सुखाचा क्षण असतो. नऊ महिने आपल्या गर्भात जो अंकुर फुलत असतो त्याचा स्पर्श ज्यावेळी तिला होतो त्यावेळचा अनुभव हा केवळ शब्दातीत असतो. पण बलात्कारातून लादलेले हे ‘आई’पण हा त्या स्त्रीला शाप वाटत असतो. अहमदनगर-मनमाड (Ahmednagar) महामार्गावरील शिंगवे नाईक येथे डॉ.राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे या दाम्पत्याने मनगाव प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात मनोविकलांग महिलांवर वैद्यकीय उपचार व समुपदेशन करण्यात येते. याच प्रकल्पात या बलात्कारपीडितेला (Rape Victim) नुकतेच दाखल करण्यात आले आहे. ही महिला रस्त्यावर सहा महिन्यांचे पोट घेऊन विवस्त्रावस्थेत फिरत होती. पोटावर ज्या २५ वासनांधांनी तिच्यावर बलात्कार केला होता त्यांची नावे तिने लिहिली होती. नियतीने लादलेल्या मातृत्त्वाची तिला घृणा वाटत होती. रडत होती…ओरडत होती… पुरुषांना दूषणं देत होती. प्रकल्पाचे प्रमुख डॉ. राजेंद्र धामणे यांनी या महिलेची हृदयहद्रावक कहाणी समाज माध्यमांवर शेअर केली आहे. (25 rapists were written on their stomachs during pregnancy)

या परिवारात काही दिवसांपूर्वी दाखल केलेल्या या गर्भवती मनोविकलांग महिलेची प्रसुती होऊन तिला मुलगा झाला आहे. तिला काही कर्तव्यदक्ष पोलिसांनी आमच्या प्रकल्पात आणले होते. ज्यावेळी तिला आणले त्यावेळी तिची मानसिकता ढासळली होती त्यातच तिला डोहाळेही लागले होते. अशा परिस्थितीत तिचे बाळंतपण करणे आमच्यासाठी आव्हानच होते. सतत वाढणारी तिची मानसिक आजाराची लक्षणे आणि पोटातील बाळाची काळजी घेऊन हे बाळंतपण पार पडायचे म्हणजे एक दिव्यच होते. आई व बाळाचा जीव वाचवण्यासाठी अखेर सिझेरियन केले आणि आमच्या या ३९ व्या लेकराचा जन्म झाला, असे डॉ. धामणे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. स्रीरोग व प्रसूतीशास्र तज्ञ डॉ. गणेश बडे व डॉ. छाया बडे यांनी या महिलेची सुख़रूप प्रसुती केली.

हे सुद्धा वाचा

नात्याला काळिमा : नराधम आईनेच पोटच्या मुलींना फेकले देहविक्रीच्या जाळ्यात

Nagpur Rape Case : स्कूल व्हॅन चालकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Gang Rape : धक्कादायक! एका पुजाऱ्याने महिलेकडून पैसे उकळत केला सामुहिक बलात्कार

 

११ व्या वर्षीच झाला होता अत्याचार

हिंदी भाषिक पट्ट्यातील ही २४-२५ वयोगटातील मुलीचे शिक्षण सुरु होते. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी ती कामही करत होती. ११ व्या वर्षी तिच्याच नात्यातील एका वासनांधाने बलात्कार केला आणि मग हे बलात्काराचे सत्र सुरूच राहिले. त्यानंतर प्रत्येक जण तिच्या शरीराची आस धरू लागला. एक दोन नव्हे, तर तब्बल २५ जणांनी तिच्यावर बलात्कार केला. हळहळू मानसिकरीत्या ती कोलमडत गेली. रस्त्यावर सहा महिन्यांचे पोट घेऊन विवस्त्रावस्थेत फिरताना एका कर्तव्यदक्ष पोलिसाने तिला माऊलीला मनगावी आणलं.

कुटुंबियांनकडूनही आधार मिळत नाही

मनोविकलांगतेचा त्रास सहन केलेल्या अथवा करीत असलेल्या तब्बल ४५२ महिला व ३८ मुले या प्रकल्पात आहेत. नुकतीच ३९ व्या ‘कबीर’ची त्यात भर पडली आहे. पण या महिलांच्या दुर्दशेबाबत सांगताना त्यांनी सांगितले की, बर्‍याचदा या महिला बर्‍या होऊनही त्यांच्या कुटुंबीयांकडूनही त्यांना आधार मिळतनाही. त्यामुळे कुटुंबियांकडून झिडकारण्यात आलेल्या त्या महिला मनगावमध्येच राहतात. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध प्रकल्पही मनगावमध्ये राबवले जातात.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी