30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रसोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक उभारणार, उद्धव ठाकरे, अजित पवारांच्या उपस्थितीत ऑक्टोबरमध्ये...

सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक उभारणार, उद्धव ठाकरे, अजित पवारांच्या उपस्थितीत ऑक्टोबरमध्ये होणार शुभारंभ

टीम लय भारी

मुंबई : सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारावा, त्यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करावे अशी धनगर व बहुजन समाजाकडून मागणी करण्यात येत होती. ‘महाविकास आघाडी’ सरकारने ही मागणी मान्य केली आहे ( Mahavikas Aghadi government will built Ahilyadevi Holkar’s statue at Solapur University ).

हे काम मार्गी लागावे यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी तीन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. त्यांना निवेदनही दिले होते. आमदार रोहित पवार यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा केला होता  ( Sakshana Salgar was met to Supriya Sule and Rohit Pawar for Ahilyadevi Holkar’s statue ).

त्यानुसार बुधवारी आमदार रोहित पवार, सक्षणा सलगर व अहिल्यादेवी होळकरांचे वंशज अक्षय शिंदे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.

सामंत यांनी तात्काळ ही मागणी उचलून धरली. एवढेच नव्हे तर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. मृणालिनी फडणवीस यांच्याशी ऑनलाईन बैठक आयोजित केली.

अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारणी व अध्यासन केंद्राची तयारी करा. येत्या ऑक्टोबर महिन्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ होईल अशी घोषणाही सामंत यांनी केली ( Uddhav Thackeray and Ajit Pawar will attend foundation ceremony at Ahilyadevi Holkar university Solapur ).

पुतळा उभारणी व अध्यासन केंद्रासाठी सोलापूर विद्यापीठाने अडिच कोटी रूपयांचा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

प्रस्तावात असलेल्या प्रमुख बाबींची माहितीही त्यांनी यावेळी शिक्षणमंत्री सामंत यांच्याकडे सादर केली. त्यानंतर शिक्षणमंत्री सामंत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यात येईल व विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींच्या नावाने अध्यासन केंद्र आणि अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव मदत करण्यात येईल, असे सांगितले ( Uday Samant sanctioned Ahilyadevi Holkar university’s proposal).

lay bhariयेथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी