32 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रAjit Pawar : अब्दुल सत्तारांना विनाश काले विपरीत बुध्दी; अजित पवारांनी थेट...

Ajit Pawar : अब्दुल सत्तारांना विनाश काले विपरीत बुध्दी; अजित पवारांनी थेट घेतला खरपूस समाचार

"मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहीण सुप्रिया सुळे हिला काही बोलले. विनाशकाले विपरीत बुद्धी हेच त्यांना बोलले पाहिजे. आपण काय बोलतो, मंत्री केलं म्हणजे वेगळे झाले का, मंत्रीपदे येतात आणि जातात... कोण आजी... कोण माजी असतात. परंतु शेवटी आपण नागरीक आहोत. संविधान, कायदा, नियम याचा सर्वांनी आदर करायला हवा, पण यामध्ये हे चुकत आहेत. त्यामुळे त्यांना जपून बोलण्याची ताकीद द्यायला हवी," असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यापार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांचा खरपूस समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, “मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहीण सुप्रिया सुळे हिला काही बोलले. विनाशकाले विपरीत बुद्धी हेच त्यांना बोलले पाहिजे. आपण काय बोलतो, मंत्री केलं म्हणजे वेगळे झाले का, मंत्रीपदे येतात आणि जातात… कोण आजी… कोण माजी असतात. परंतु शेवटी आपण नागरीक आहोत. संविधान, कायदा, नियम याचा सर्वांनी आदर करायला हवा, पण यामध्ये हे चुकत आहेत. त्यामुळे त्यांना जपून बोलण्याची ताकीद द्यायला हवी,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

यावेळी अजित पवारांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर देखील भाष्य करत हल्लीच्या राजकारणात वाचाळविरांचे मोठे प्रस्थ वाढल्याचे म्हणाले. काही मंत्र्यांच्या बोलण्यामुळे मंत्रीमंडळाचीच प्रतिमा खराब होत आहे. आपल्या विधानावर काही जण म्हणतात, मी सहज बोललो. पण तुम्ही सहज बोलायला काय सामान्य नागिरक आहात का? असा सवाल करतानाचं त्यांनी राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात, तुमच्यावर जबाबदारी टाकली आहे, तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे. तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे. त्याची आठवण ठेवून बोला, अशा शब्दांत वाचाळवीरांना खडे बोल सुनावले. यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, या वाचाळवीरांना आवरा. त्यांना ताबडतोब सूचना द्या. महाराष्ट्राची जी परंपरा त्याला गालबोट लावू देऊ नका. आज विदारक चित्र पाहायला मिळत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
हे सुद्धा वाचा :

Bharat Jodo Yatra : तिरंगा श्रीनगरमध्ये नेऊन फडकवणार, कोणीही अडवू शकत नाही : राहुल गांधी

Chh. Shivaji Maharaj : छ. शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा भव्य पुतळा प्रतापगडावर उभारणार!

Shiv Sena Split : दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली

अजित पवार म्हणाले. पोलीस आणि सचिवांनी देखील आपली भूमिका कणखर मांडली पाहिजे. देशात आपल्या राज्याचा नावलौकिक आहे, तो ढासळू देता कामा नये, जी परंपरा महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली आहे, ती घडी विस्कटू न देता सत्ताधारी पक्षाचे लोक, मंत्रीमंडळातील लोक चुकत असतील तर त्यांना स्पष्ट सांगितले पाहिजे. तसेच
सध्या राजकीय वातावरणात रोजच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र टिका टिपण्णी करताना राजकीय नेते अनेकदा वैयक्तिक, कौटुंबिक पातळीवर घसरत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण खालच्या पातळीवर गेले आहे. अनेक नेते मंत्री आपल्या विरोधकांवर टिका करताना पातळी सोडून बोलत आहेत. त्यामुळे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी अशा वाचाळवीरांना आवर घातला पाहिजे असे म्हटले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी