31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रअंबड औद्योगिक पोलीस ठाण्याने रोखला बालविवाह..

अंबड औद्योगिक पोलीस ठाण्याने रोखला बालविवाह..

शासनाच्या वतीने बालविवाह करू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात असतांना नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर कारगिल चौक येथे एका सतरा वर्षीय अल्पवायीन युवतीचा बालविवाह होणार असल्याची माहिती अंबड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व सहकार्यांना मिळाली आणि बालविवाह रोखण्यासाठी हालचालींना वेग आला.दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी एका सतरा वर्षीय अल्पवायीन मुलीचा विवाह चाळीसगाव, पोहरे येथील एका मुलासोबत होणार असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली.लग्न घरात खेळीमेळीच्या वातावरणात लग्नाची तयारी सुरु झाली, नातलग जमा झाले, परंतु या लग्नातील वधू अल्पवायीन असल्याने वधू व वरच्या पालकांना तात्काळ पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले.(Ambad industrial police station stops child marriage)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी पालकांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर अल्पवायीन मुलीचे लग्न करू शकत नाहीत, तर बालविवाह केल्यानंतर येणाऱ्या समस्त कायदेशीर कार्यवाही बाबतही समजावून सांगण्यात आले. वधू व वरच्या पालकांकडून विवाह करणार नसल्याबाबत लेखी आश्वासन घेण्यात आले. सदर बालविवाह रोखल्यामुळे समस्त अंबड गाववासियांच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

बालविवाह होणार असलेल्या मुलीचे संपूर्ण कागदपत्र तपासून घेत ती अल्पवईन असल्याची खात्री करून घेण्यात आली. सदर वधू व वर कुटुंबियांची समजूत काढण्यात पोलीस प्रशासनास यश आल्याने बालविवाह रोखला गेला.अंबड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या वतीने बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा बाल विकास अधिकारी,प्रकल्प नागरी नाशिक शहर यांना देखिल पत्रव्यवहार करीत माहिती देण्यात आलेली आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा’ हा मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. या कायद्यानुसार मुलीचे १८ वर्षांहून कमी
व मुलाचे २१ वर्षांहून कमी वय हे कायदेशीर विवाहासाठी योग्य नाही. वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल, तरी तो बालविवाह समजला जातो. प्रामुख्याने गरीबी, निरक्षरता हेच घटक बालविवाहास कारणीभूत ठरत आहेत. मुलींना लीं सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग म्हणून पालक याकडे पाहतात. संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली सुद्धा अनेक बालविवाह केले जातात जास्त वयाच्या पुरुषाने १८ पेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत लग्न केले, तर त्याला दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरी
आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. संबंधित वर व वधू यांचे आईवडील,नातेवाईक, मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह लावण्यास प्रत्यक्षात मदत केली, जे अशा विवाहात सामीलझाले होते, त्या सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची शिक्षा व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मात्र,संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कायद्याने अल्पवयीन ठरविलेल्या मुलीचे लग्न झाल्यास पोक्सो – २०१२ कायद्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी