28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रआंबेनळी घाटरस्त्यावरील वाहतूक 47 दिवसानंतर अखेर सुरु

आंबेनळी घाटरस्त्यावरील वाहतूक 47 दिवसानंतर अखेर सुरु

टीम लय भारी

सातारा : महाबळेश्वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटरस्त्याची मोठी दुर्दशा झाल्याने किल्ले प्रतापगड परिसरातील २२ गावांचा संपर्क तुटला होता. याबरोबरच हाच घाटरस्ता कोकण विभागाला देखील जोडत असल्याने या भागातील नागरिकांची दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. मंगळवारी या घाटरस्त्यावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र ट्रक एसटी बस सारख्या अवजड वाहनांना तूर्तास तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे (Ambenli Ghat Road finally resumed).

जुलै महिन्याच्या अखेरीस कोसळलेल्या धुवाधार पावसाने महाबळेश्वर तालुक्यात मोठे नुकसान झाले होते. या आसमानी संकटात तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या पुलाचे मुख्य रस्त्यांचे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने आंबेनळी घाटरस्त्याची मोठी दुर्दशा झाली. या घाटरस्त्यावर तीस हून अधिक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या काही ठिकाणी रस्त्याला तडे गेले होते. तर मेटतळे गावापासून अंदाजे एक ते दोन किमी अंतरावर मुख्य रस्ता तीस फूट खचल्याने वाहतूक पूर्णतः बंद झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महुहातगेघर धरणांचे लोकार्पण : सदाशिव सपकाळ

बेळगावात शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून प्रचारासाठी गेलो नाही : संजय राऊत

यामुळे किल्ले प्रतापगड परिसरातील २२ गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे याबरोबरच हाच घाटरस्ता कोकण विभागाला देखील जोडत असल्याने या भागातील नागिरकांची दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. या भागातील लोकांना जंगलमार्गातून अनेक किमीची पायपीट करूनच महाबळेश्वर या तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत होते. त्यामुळे या भागातील लोकांचे मोठे हाल होत होते मागील दीड महिन्यापासून या घाट रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळून खाली आलेली माती मोठमोठे दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते.

Ambenli Ghat Road finally resumed
आंबेनळी घाट रस्ता

प्रामुख्याने तीस फूट खचलेला हा रस्ता पुन्हा नव्याने तयार करण्याचे आव्हान बांधकाम विभागावर होते. रस्ता मोठ्याप्रमाणात खचल्याने या झालेल्या ठिकाणी गॅबेन टेकनॉलॉजीचा वापर करण्यात आला. अंदाजे तीस फूट खोल भराव टाकून त्यानंतर रस्त्यावर जाळीचे बेड तयार करून त्या बेडमध्ये दगड भरून खचलेला रस्ता जोडण्याचे काम सुरु होते. मागील दीड महिन्यापासून ऊन पाऊस वारा झेलत कर्मचारी या धोकादायक ठिकाणी काम करत होते (For the last one and a half months, the employees were working in this dangerous place).

धनंजय मुंडेंच्या जीविताला धोका, महिलेकडे आढळले बेकायदेशीर पिस्तूल

Cancel crowd-pulling events, says Maharashtra CM Uddhav Thackeray, mum on new curbs

Ambenli Ghat Road finally resumed
आंबेनळी घाट रस्त्याची पाहणी

मंगळवारी अखेर दीड महिन्यांच्या प्रतेक्षेनंतर या घाटरस्त्याचे काम पूर्णत्वास गेले असून या घाटरस्त्यावरील वाहतूक आज सुरु करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकाम विभागाच्यावतीने फलक देखील लावण्यात आले. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने प्रतापगड सह कोकणाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. या विभागातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न मिटला आहे. तूर्तास एसटी बस, ट्रक सारख्या अवजड वाहनांना मात्र अजूनही काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे. सोमवारी या घाटरस्त्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी दिनेश पवार यांनी केली. आंबेनळी घाटरस्त्याचे काम चांगल्यापद्धतीने व लवकरात लवकर होऊन या भागातील जनतेला दिलासा देण्याबाबतचा पाठपुरावा आमदार मकरंद पाटील यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी