31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीय'आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत'

‘आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत’

टीम लय भारी

मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्यावर कणखर आरोप केले आहेत. स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. या शब्दात प्रवीण दरेकरांनी नवाब मलिक यांना प्रतिउत्तर दिले आहे (Praveen Darekar has leveled strong allegations against the Nawab Malik).

माध्यमांवर भरोसा ठेवून सरकार रेटत आहात, त्यासाठी काहीही परिश्रम घेत नाहीत असे घणाघाती शब्द दरेकरांनी आपल्या उत्तरात वापरले आहेत. आम्ही चौकशीला घाबरत नाहीतर मात्र नोटीस आल्यावर लपून बसतात असेही दरेकर म्हणाले आहेत.

सदाभाऊ खोतांच्या मुलाने युवा आघाडीच्या अध्यक्षांवर उगारले शस्त्र

गोपीचंद पडळकर विजय वडेट्टीवारांना म्हणाले मांजर!

असेच प्रकार बेळगावमधील भाजपाच्या विजयानंतर काही नेते करीत आहेत. मराठी माणसाचा पराभव असे शब्द वापरत आहेत. पण भाजपाच्या विजयी 36 नगरसेवकांपैकी 23 मराठी आहेत, हे मात्र सांगत नाहीत. गलितगात्र काँग्रेस च्या जागेवर आता शिवसेनेला जाऊन बसायला वेळ लागणार नाही अशा आशयाचे शब्द दरेकरांनी आपल्या प्रतिउत्तरात वापरले आहेत.

बेळगावात शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून प्रचारासाठी गेलो नाही : संजय राऊत

Praveen Darekar
‘आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत’

How Did The Bottles Of Liquor Come To The Ministry? Pravin Darekar’s Letter To The Chief Minister

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आयपीएस अधिकार्‍यांसोबत बैठकी झाल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जातेय, हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे ‘आधी चोर्‍या-आता बहाणे’ असा प्रकार आहे, अशा शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी