28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रबच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा भोवला; कोर्टाने ठोठावली शिक्षा

बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा भोवला; कोर्टाने ठोठावली शिक्षा

उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये २०१५ साली दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात येणारा निधी खर्च न केल्यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी हे आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करत पोलिसांशी देखील हुज्जत घातली होती. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने आज बच्चू कडू यांना या प्रकरणात कलम 506 नुसार दोषी ठरवत कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत बसून राहणे आणि 2500 रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. तसेच या प्रकरणातील अन्य तिघांना कोर्टाने निर्दोष सोडले आहे. (Bacchu Kadu guilty of obstructing government work, sentenced by the court)

जिल्हा परिषदेत आंदोलन करत तेथे पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे बच्चू कडू आणि इतर तीन जणांवर सरकारी कामांत अडथळा आणल्याबद्दल धाराशिव (उस्मानाबाद) शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सोमवारी (दि. 27) रोजी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी आमदार कडू यांना याप्रकरणात दोषी ठरवत त्यांना कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत कोर्टात बसून राहणे आणि 2500 रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. तसेच इतर तीघा जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

हे सुद्धा वाचा

काय संगता : लोकल ट्रेनमध्ये महिलांनी साजरी केली बॅचलर पार्टी..!

VEDIO : तुमच्या कोंबडी हुलला आम्ही भीक घालत नाही ; भास्कर जाधव यांचा एकनाथ शिंदे गटाला टोला

विधानभवनातील गैरसोयींमुळे आमदार आईला रडू कोसळले…

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे दिव्यांगासाठी काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. राज्यात अनेक ठिकाणी ते दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने देखील करतात. त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे अनेकदा ते प्रशासकीय अधिकाऱ्यांशी देखील हूज्जत घालतात. त्यामुळे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी