30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनकाय सांगता : लोकल ट्रेनमध्ये महिलांनी साजरी केली बॅचलर पार्टी..!

काय सांगता : लोकल ट्रेनमध्ये महिलांनी साजरी केली बॅचलर पार्टी..!

मुंबई लोकल ट्रेन म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ती भरमसाठ गर्दी, प्लॅटफॉर्मवरील वर्दळ, धक्काबुक्की आणि ट्रेनमध्ये जागा मिळवण्यासाठी केली जाणारी भांडणं. सध्या लग्नाचे सीझन सुरू आहे. अन् याचा प्रभाव मुंबईच्या लोकल ट्रेनमध्येही पाहायला मिळतोय. ट्रेनमध्ये काही महिलांनी मिळून चक्क होणाऱ्या नववधूसाठी बॅचलर पार्टी साजरी केल्याचे दिसून आले. भर गर्दीतही या महिला मोठ्या आनंदाने तिच्या उत्साहात सहभागी झाले. आपण दरवेळेस लोकलमध्ये गरबा खेळणाऱ्या महिलांचा व्हिडीओ पाहत आलोय. पण लोकलमध्ये बॅचलर पार्टी करणाऱ्या या Bridesmaid ची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. (Bachelor party celebration in mumbai local women coach)

लग्न झाल्यावर पुन्हा अशी मजा करता येईल की नाही माहीत नाही. त्यामुळे मित्रांबरोबर शेवटची मजा करून घेणं म्हणजेच मुलांची बॅचलर पार्टी. लग्नापूर्वीच्या त्या पार्टीची मजा प्रत्येकाने अनुभवायला हवी. पाश्चिमात्य देशातील लोकांप्रमाणे हल्ली भारतातही मोठ्याप्रमाणात नवरदेव अथवा नववधूचे कपाळी बाशिंग लागण्यापूर्वी हा सण साजरा केला जात आहे. लग्नापूर्वी कसलेही बंधन नसणाऱ्या उनाड पक्ष्याचं आयुष्य बंदिस्त होण्याआधीची ही ‘बॅचलर पार्टी’ मुलांसाठी किती महत्त्वाची असते, हे आज पुन्हा आपल्याला दिसून आले आहे.

मुंबईच्या कसारा लोकल ट्रेनमध्ये मैत्री झालेल्या या महिला मंडळाने अर्थात ब्राइड टीमने होणारी वधु प्रियंका पाटिलसाठी बॅचलर पार्टीचे आयोजन केले. ट्रेनमध्येच प्रवासा दरम्यान त्यांनी फुगे, केक, पोस्टर यांचे सजावट केले आणि तिचा आनंद द्विगुणित केला. दरम्यान तीन आठवड्यापूर्वी इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या या व्हिडिओला 1 लाख 80 हजाराहून अधिक जणांनी पहिले आहे आणि 16 हजारांहून अधिक जणांनी पसंत केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by pratiksha nyaupane (@localtrain_girl)

नेटकऱ्यांनी सुद्धा कमेन्टचा वर्षाव करत या त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. रवीना बैरागी ह्या वापरकर्तीने लिहिले आहे की,  हे फक्त मुंबईतच घडू शकते. महिलांनो तुमचा अभिमान आहे आणि अभिमान आहे मुंबईकर असल्याचा. सर्व महिला आणि वधूला प्रेम. पुढे तृप्ती पोतदार या वापरकर्तीने लिहिले आहे की, मुंबईच्या या गोष्टी मुंबई आणि सर्व महिलांना खास बनवतात. मुंबईचा खरा आत्मा कुठेही असो, सदैव आनंदी रहा.

हे सुद्धा वाचा : गुजरातच्या पाणीपुरीवाल्या मोदीची सोशल मिडियावर धूम! व्हिडिओ होतोय व्हायरल

हृदयस्पर्शी: IPS लेकीने केला DGP वडिलांना सॅल्यूट; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

राणादा आणि पाठकबाईंचं लग्नानंतरचं पहिलं व्हॅलेंटाईन डे; खास क्षण सोशल मिडियावर व्हायरल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी