33 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरराजकीयAmol Mitkari On Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्या ट्विटला अमोल मिटकरींनी...

Amol Mitkari On Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्या ट्विटला अमोल मिटकरींनी दिले उत्तर

मोहित कंबोज यांच्या रोहित पवारांनरील ट्विटचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मोहित कंबोज हे कोणाच्या डोक्याने चालतात, हे सर्वांना माहित आहे, असे म्हंटले.

भारतीय जनता पक्षाचे मोहित कंबोज यांनी सहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखी एक नेता लवकरच जेलमध्ये नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची भेट घेणार असे ट्विट केले होते. त्यानंतर मोहित कंबोज यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत आणि संजय पांडे यांची नावे पोस्ट करत पाचवी जागा रिकामी ठेवली होती. त्यामुळे आता पाचवा नंबर कोणाचा ? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते. तसेच ती पाचवी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्याची थोडक्यात माहिती मोहित कंबोज यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. परंतु आता ती पाचवी व्यक्ती म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार असल्याचे बोलले जात आहे.

आज (ता. २२ ऑगस्ट) मोहित कंबोज यांनी बारामती ऍग्रो लिमिटेड बद्दल पोस्ट करत आपण स्वतः या केसचा पाठपुरावा करून अभ्यास करत असल्याचे ट्विट केले आहे. सदर ट्विट मोहित कंबोज यांनी आमदार रोहित पवार यांना टॅग केलेले आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर रोहित पवार यांना सुद्धा कारागृहात जावे लागणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान आता यापुढे रोहित पवार हे भाजपचे पुढील टार्गेट असणार आहे का ? असे सुद्धा विचारण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांचा ‘ऐक’ नाथ होऊ नये,धनंजय मुंडेंची कोपरखळी !

MPSC Students : एमपीएससी विद्यार्थ्यांचे सरकारविरोधात अनोखे आंदोलन

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे लवकरच राज्यभर ‘महाप्रबोधन’

परंतु मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या या ट्विटचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मोहित कंबोज हे कोणाच्या डोक्याने चालतात, हे सर्वांना माहित आहे. तसेच पवार कुटुंबीय कसे काम करतात, हे सुद्धा सर्वांना माहित आहे. त्याच्या प्रश्नाला किंवा ट्विटला उत्तर द्यावे, इतके ते नक्कीच मोठे नाही, असे मत अमोल मिटकरी यांच्याकडून व्यक्त करण्यात आले. काजू, बदाम, खारका खाऊन मोहित कंबोज यांनी जे भोंग्यासारखे शरीर वाढवून ठेवले आहे, त्याचा वापर करत त्यांनी मेळघाटातील कुपोषित लोकांचे, शेतकऱ्यांचे दुःख जाऊन पाहावे आणि मग शेतकऱ्यांवर भाष्य करावे, असेही अमोल मिटकरी यांच्याकडून बोलण्यात आले.

भाजपच्या भोंग्यांना मी कधीच महत्व देत नाही. भाजपमधील दोन-चार जण कधीही पवार कुटुंबियांवर भाष्य करतात, हे भाजपमधील कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात, हे सर्वांना माहित आहे, असाही टोला अमोल मिटकरी यांच्याकडून भाजप आणि मोहित कंबोज यांना लागवण्यात आला आहे. पण आता मोहित कंबोज यांच्या या ट्विटनंतर खरंच रोहित पवार यांचाच पुढचा नंबर आहे का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी