30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रराजभवनाच्या दारावर चक्रम वादळे,शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल!

राजभवनाच्या दारावर चक्रम वादळे,शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल!

टीम लय भारी

मुंबई : “कोरोना संकटात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकार म्हणून पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी-पालक आणि शिक्षण तज्ञांनी याचे स्वागत केले. पदवीच्या अंतिम परिक्षेवरून भाजप महाविकास आघाडीमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपालांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे” अशा कानपिचक्या ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत.

सध्या पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरुन राज्यपाल व राज्य सरकारमध्ये मतभेदांचे जाहीर प्रदर्शन सुरु आहे. राज्यपालांच्या सद्सदविवेकबुद्धी बुद्धीवर आमचा विश्वास आहे, पण राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे” अशी भीती अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

एक दिवस संतप्त विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर येतील…

अमेरिकेत पोलिसांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सुनावल्याचा दाखलाही देण्यात आला आहे. “एक दिवस संतप्त विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर येतील आणि घोळ घालून एक पिढी बरबाद करणाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्यांना सुनावतील, “तुमच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आमचा छळ का करता? बोलण्यासारखे, करण्यासारखे काही नसेल तर तोंड बंद ठेवा” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“कोरोना संकटात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकार म्हणून पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी-पालक आणि शिक्षण तज्ञांनी याचे स्वागत केले. मात्र प्रत्येक बाबतीत विरोधच करायचे, असे ठरवून काम करत असलेल्या विरोधी पक्षाने तात्काळ राजभवन गाठले आणि परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला. विरोधकांचे पत्र मिळताच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करणारे पत्र लिहिले” अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखात ताशेरे ओढण्यात आले आहेत. “देशभरात अनेक ‘बडे लोग’ बोगस डिग्री घेऊन राजकारणात वावरत आहेत. ‘कोरोना ग्रॅज्युएट’ होण्यापेक्षा हे बोगस पदवीवले डेंजर. ही यादी दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे.” असे टोलेही लगावले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी