30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रडिस्चार्ज मिळताच राज्यपाल कोश्यारी ऍक्शन मोडमध्ये

डिस्चार्ज मिळताच राज्यपाल कोश्यारी ऍक्शन मोडमध्ये

टीम लय भारी

मुंबई : राज्यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून ‘सत्ता’नाट्य सुरु आहे. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली. त्याचदिवशी म्हणजे २२ जूनला राज्यपाल हे कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समोर आली. पण आज रविवारी राज्यपाल कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यपाल राजभवनाकडे रवाना झाले.

राजभवनात दाखल झाल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विटरवर ट्विट पोस्ट केले आहे. यात त्यांनी म्हंटले आहे की, ‘आज चार दिवसानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आता मी पूर्णपणे स्वस्थ आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दोन दिवस विश्रांती घ्यावी लागेल. सर्व शुभचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानतो.’

डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यपालांना दोन दिवसांची विश्रांती सांगण्यात आलेली असली तरी, त्यांनी राज्यातील बंडखोर आमदारांसाठीचे पत्र महाराष्ट्राच्या डीजीपींना पाठवले आहे. बंडखोर आमदारांच्या घरावर आणि कार्यालयावर शिवसैनिकांकडून हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा देण्यात यावी, यासंदर्भाचे पत्र राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई पोलीस कमिशनर आणि महाराष्ट्र डिजिपी यांना पाठविले आहे.

राज्याच्या सत्तांतरणामध्ये राज्यपालांची भूमिका ही महत्वपूर्ण असते. परंतु राज्यात सत्तानाट्य सुरु झाल्यानंतर कोश्यारी हे कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झाले. पण आता त्यांना डिस्चार्ज मिळाल्याने सर्वांचे लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे. दरम्यान, केंद्राकडून बंडखोरी केलेल्या १५ आमदारांना सीआरपीआफ सुरक्षा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात सुरु असलेल्या राजकारणाच्या गदारोळामध्ये भाजप आणि केंद्राची महत्वाची महत्वाची भूमिका असल्याचे असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा :

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचले; मांजराच्या अवतारातील वाघाचा फोटो टाकून उडविली खिल्ली

बंडखोर आमदारांचा खर्च कोण करतेय, अनिल गोटेंनी केली ईडीकडे तक्रार !

VIDEO : एकनाथ शिंदे आमदारांना घेवून गुवाहाटीलाच का गेले, माजी खासदार आनंद परांजपेंनी सांगितले अचंबित करणारे कारण !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी