31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रकॉंग्रेसचे नेते हरखले, चांद्रयान ३ चे लँडींग पाहण्यासाठी बैठक थांबविली !

कॉंग्रेसचे नेते हरखले, चांद्रयान ३ चे लँडींग पाहण्यासाठी बैठक थांबविली !

केंद्रातील मोदी सरकारविरोधात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासंदर्भात विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ ची मोर्चेबांधणी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून आज (दिं.२३) रोजी बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा सुरु असतानाच चांद्रयान – ३ च्या लॅंडिंगची वेळ झाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी चर्चा थांबवून चांद्रयान ३ च्या लॅंडिगचे थेट प्रक्षेपण पाहिले. ही मोहीम यशस्वी होताच सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

केंद्रातील मोदी सरकार विरोधात आगामी लोकसभा निवडणुकीत रणनीती आखण्यासाठी इंडियाच्या बैठका सुरु असून पहिली बैठक पाटण्यात झाली होती. त्यानंतर दुसरी बैठक बंगळुरुत पार पडली. तिसरी बैठक मुंबईत पार पडणार आहे. येत्या ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत नियोजित ‘इंडिया’च्या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आज दिवसभर एकापाठोपाठ बैठकींचे सत्र सुरू होते. काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण हे सायंकाळी नियोजनाची समीक्षा करत असतानाच ५.४५ वाजले. सायंकाळी ६ वाजता चांद्रयानचे लँडिंग असल्याने चव्हाण यांनी चर्चा थांबवली व टॅबवर मोहिमेचे थेट प्रक्षेपण बघितले.

हे सुद्धा वाचा 
IAS Transfer : कान्हूराजे बगाटे महानंदचे एमडी, डॉ. किरण पाटील बुलढाणा कलेक्टर !

संतापजनक: राज्य सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘अस्पृश्यते’ची वागणूक!

भारताने घडवला इतिहास, चांद्रयान- 3 चे यशस्वी लॅंडींग !

यावेळी त्यांच्यासमवेत मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षा प्रा. वर्षाताई गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य गुरूदीप सप्पल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, बी.एम. संदीप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे पदाधिकारी गौरव पांधी आदी उपस्थित होते. चांद्रयान-३ सुरक्षितपणे चंद्रावर उतरल्यानंतर सर्वच नेत्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला व त्यानंतर पुढील चर्चा सुरू झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी