27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंनी साजरा केला रक्षाबंधन, जाणून घ्या बहिणीचे नाव

धनंजय मुंडेंनी साजरा केला रक्षाबंधन, जाणून घ्या बहिणीचे नाव

देशात रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा होत आहे. असे असताना राजकारणात व्यस्त असलेल्या दोन बहीण भावाने हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. मुंडे व तटकरे या दोनही कुटुंबात कायम स्नेह व ऋणानुबंध पाहायला मिळाले आहेत.

‘ताई, तुझा हा भाऊ कायम पाठीशी आहे व पुढेही राहील,’ असा शब्द यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी आदिती तटकरे यांना दिला आहे. राष्ट्रवादीचे आमदार, कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे. मध्यंतरी या भावा-बहिणीचे बिनसले होते, त्यामुळे धनंजय मुंडे हे आदिती तटकरे यांच्याकडून तर पंकजा मुंडे या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना राखी बांधून हा सण साजरा करतात.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे सख्खे चुलत भाऊ. गोपीनाथ मुंडे हयात असताना हे दोघे रक्षाबंधनाला एकत्र येत असत. गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर कालांतराने न पटल्याने धनंजय मुंडे यांनी काकाची साथ सोडली. पण काकाची साथ सोडल्यावर त्यांना राजकारणात येण्यासाठी कष्ट घ्यावे लागले. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर बीडच्या राजकारणाला नवे वळण लागले. आणि डीएम उर्फ धनंजय मुंडे नावाचा नवा तारा बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात उदयास आला. त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकीय खटके उडू लागले. पण सण आणि घरगुती कार्यक्रमानिमित्त ते भेटतात आणि राजकारण विसरून हे दोघेही रक्ताची नाती निभावतात.

काही वर्षापूर्वी या बहीण भावाचे बिनसले होते, तेव्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी राखी बांधली. तेव्हापासून जानकर त्यांना बहीण मानत दरवर्षी त्यांच्याकडून राखी बांधून घेतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे दोघे भाऊ-बहीण परळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीला उभे होते. पण धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केल्याने दोघांमध्ये फारसे सख्य नव्हते.
हे सुद्धा वाचा
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त थोरात, तांबे कुटुंबिय एकत्र
योगी आदित्यनाथ यांना रक्षाबंधनानिमित्त मुलींनी बांधली राखी
खासदार श्रीकांत शिंदेंच्या सौभाग्यवतीने धरला मंगळागौरचा फेर !

पंकजा मुंडे या आगामी काळात राजकीय स्पर्धक होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पंख कापायला घेतले. परळीत धनंजय मुंडे चांगल्या मतांनी विजयी झाले. यानंतर फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात महिला व बालकल्याणमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्यासह विविध आरोप झाले होते. दुसरीकडे विधान परिषदेवर त्यांना घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे भाजपने टाळले. त्यामुळे पंकजा मुंडे गेल्या अनेक महिन्यापासून नाराज होत्या. पक्षाच्या बैठकांना त्या उपस्थित राहत नसत. भागवत कराड यांना केंद्रात मंत्री करून भाजपने पंकजा मुंडे यांना कात्रजचा घाट दाखवला होता. या सगळ्या घडामोडीनंतर पंकजा मुंडे यांची अवस्था हातपाय बांधून बुककयाचा मार देण्यासारखी झाली आहे. त्यामुळेच की काय सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली होती.

त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून पंकजा मुंडे ब्रेकवर गेल्या होत्या. त्यामुळे राजकीय घडामोडीपासून त्या पूर्णपणे दूर गेल्या होत्या. पण धनंजय मुंडे कृषिमंत्री झाल्यावर पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले होते. दरम्यान, मुंडे बहीण भावाचे संबंध काहीसे कटू झाल्यावर आदिती तटकरे या धनंजय मुंडे यांना भाऊ मानत राखी बांधतात, तर पंकजा मुंडे या महादेव जानकर यांना राखी बांधतात. तसेच गोपीनाथ मुंडे असल्यापासून सुनील तटकरे यांचे हा कुटुंबाशी स्नेहाचे संबंध आहेत. धनंजय मुंडे आणि तटकरे कुटुंबाचे चांगले संबंध आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी