29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार : धनंजय मुंडे

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार : धनंजय मुंडे

टीम लय भारी

सातारा: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केले आहे.साताऱ्याच्या सभेते त्यांनी हे विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी मुख्यमंत्रीपदा वरुन विधान केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

आज आपल्याला सांगतो, पवार साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. पाच वर्षे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या प्रश्नवारती कितीही मजबूत कितीही वजनदार सरकार असलं तरी त्याला गदागदा हलवायचं काम मी विरोधी पक्षनेता म्हणून केलं. म्हणून आज शब्द देतो की सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाचा मंत्री म्हणून येणाऱ्या काळात साामजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं मंत्रिपद द्यायचं कोणाला हा प्रश्न पुढ्यात आला;

तर जे कोणी मुख्यमंत्री असतील.. आपलेच असतील… ते म्हणतील हा विभाग आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाला नको. एवढी प्रतिष्ठा प्राप्त करुन द्यायचं काम येणाऱ्या काळात करुन दाखवीन हे वचन मी आज तुम्हाला देतो,” असे धनंजय मुंडे म्हणाले.

हे सुद्धा वाचा: 

पनवेल ही नावाजलेली महापालिका होईल : देवेंद्र फडणवीस

Karnataka: Right-wing groups gather in Mandya for march to Srirangapatna mosque, prohibitory orders imposed

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी