35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपनवेल ही नावाजलेली महापालिका होईल : देवेंद्र फडणवीस

पनवेल ही नावाजलेली महापालिका होईल : देवेंद्र फडणवीस

टीम लय भारी 

पनवेल :  शहरे ही चुंबकासारखी केंद्र बनतात. त्यामुळे शहरांचा विकास नियोजनपुर्वक केले पाहिजे. शहरीकरण अभिशाप न मानता त्याला संधी मानली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शहरांच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे. पनवेलजवळ होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक यांसारख्या योजनांमुळे पनवेल हे तिसरी मुंबई ठरेल.आज जी कामे झाली आहेत ती अतिशय चांगली झाली आहेत, प्रशासकीय इमारत, शाळा, तलाव, क्षेत्रीय कार्यालये अशीच कामे येत्या काळात सुरू राहिल्यास पनवेल नावाजलेली महापालिका होईल असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. या सर्व कामाबद्दल महापौर, आयुक्तासह पालिकेच्या सर्व सदस्यांचे,अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. (Panvel will be a renowned Municipal Corporation: Devendra Fadnavis)

पनवेल महानगरपालिकेच्या भव्य दिव्य महानगरपालिका स्वराज्य’ इमारतीचे भूमीपूजन समारंभ आणि इतर विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका स्थापनेपासूनचा आजपर्यंतचा विकास यांचा आढावा घेतला. या पालिकेत चांगली कामे करण्यासाठी सर्वच पक्षांचा पाठिंबा असल्याचे सांगितले.महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी गेल्या पाच वर्षात महापालिकेने राबविलेल्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नवी मुंबई पेक्षा मोठी सर्वोत्कृष्ट प्रशासाकिय इमारत पनवेल महापालिकेची असेल असा विश्वास व्यक्त केला.खारघरमधील पांडव कड्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन केले.

यावेळी प्रशांत ठाकूर म्हणाले, राज्यातील सर्वात तरूण असलेली ही महापालिका देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने झाली. महापालिका क्षेत्रात असलेल्या गावांच्या विकासावर विशेषत्वाने प्राधान्य दिले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणेच पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय सर्व सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य करण्याची यावेळी विनंती केली.याप्रसंगी सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी, कर्मचारी, पनवेल क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी पुढीलप्रमाणे भूमीपूजन समारंभ करण्यात आले

1)प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महाकाली नगर, वाल्मिकी नगर, टपाल नाका, लक्ष्मी वसाहत येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास करून घरे बांधणे.

2)प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पटेल मोहल्ला व कच्छी मोहल्ला येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास करून घरे बांधणे.

3)प्रभाग क्र. १६ मधील भूखंड क्र. २८, से. ११, नवीन पनवेल (पूर्व) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र (अॅकेडमी) विकसित करणे.

4)प्रभाग क्र. ४ मधील भूखंड क्र. १५१, से. २१ खारघर येथे महापौर निवासस्थान – ‘शिवनेरी’ बांधकाम करणे.

5)प्रभाग क्र. ७ मधील भूखंड क्र. ५, ६, ७ व ८, से. ८ई कळंबोली येथे प्रभाग कार्यालय – ‘विजयदुर्ग’ बांधकाम करणे.

6)भूखंड क्र. १३, काळुंद्रे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे.

7)प्रभाग क्र. १३ मधील जुई गावामध्ये मल:निस्सारण वाहिन्या टाकणे, पंम्पिंग स्टेशन बांधणे व मल: प्रक्रिया केंद्र उभारणे.लोकार्पण समारंभ

१) पनवेल येथील अंतिम भूखंड क्र. १२५ मधील सुशोभिकरण केलेले वडाळे तलाव.

२) पनवेल येथील अंतिम भूखंड क्र. १२७ अ मधील प्राथमिक मराठी कन्या शाळेची इमारत.

३)प्रभाग क्र. १३ मधील सुशोभिकरण केलेले जुई गावामधील तलाव.

४) अमृत अभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजनेतून पनवेल येथील मार्केट यार्ड, तक्का रोड, इच्छापूर्ती गणेश मंदिर, हरि ओम नगर, एच.ओ.सी. कॉलनी जवळील उभारलेले उंच जलकुंभ.


हे सुद्धा वाचा :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई- बेलापूर वॉटर टॅक्सी आणि बेलापूर जेटी चे उद्घाटन

मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा दरम्यान ७२ तासांचा जम्बो मेगाब्लॉक

महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणेबाबत, मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यामंत्र्यांना आमदारांनी धाडले पत्र

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी