35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमुंबईरविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

टीम लय भारी

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला असून, मध्य रेल्वेच्या अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत ब्लॉक असेल. तसेच, हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल- वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ०४.०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Megablock on Central and Harbor Way on Sunday)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. नियोजित थांबे घेऊन आपल्या गंतव्य स्थानकावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

सकाळी १०.५० ते दुपारी ०३.४६ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी १०.३३ ते दुपारी ०३.४९ वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

सकाळी ११.०२ ते दुपारी ०३.५३ वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच सकाळी १०.०१ ते दुपारी ०३.२० वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू राहतील
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ – खारकोपर दरम्यान उपनगरीय सेवा सुरू राहतील.


हे सुद्धा वाचा : 

रविवारी 24 तासांचा मेगा ब्लॉक, ठाणे-दिवा मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम,लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार : धनंजय मुंडे

पनवेल ही नावाजलेली महापालिका होईल : देवेंद्र फडणवीस

गोपीनाथ मुंडे मोठ्या मनाचा माणूस : आमदार जितेंद्र आव्हाड

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी