30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रभारत डिजिटल पेमेंटमध्ये अग्रगण्य; चार वर्षात 200% पर्यंत सर्वाधिक ऑनलाइन व्यवहार..!

भारत डिजिटल पेमेंटमध्ये अग्रगण्य; चार वर्षात 200% पर्यंत सर्वाधिक ऑनलाइन व्यवहार..!

देशात डिजिटायझेशनला चालना मिळाल्याने रोख रक्कम वापरत व्यवहार करण्याऐवजी आता ई-वॉलेट आणि यूपीआयचा वापर वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आर्थिक व्यवहार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे व्यवहार करणे सरळ आणि सोपे झाले आहेत. दरम्यान, आर्थिक वर्ष २०१८-१९ पासूनच्या या चार वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणात २००% हून अधिक वाढ नोंदवण्यात आली. नागरिक आता रोख रक्कम वापरून व्यवहार करण्याऐवजी ई-वॉलेट आणि यूपीआयचा वापर करीत आहेत त्यामुळे बदलत्या युगात तंत्रज्ञानाच्या दिशेने टाकलेले हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. (Digital payment growth up to 200% in India)

भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळाकडे (National Payments Corporation of India) उपलब्ध आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४५ अब्जांहून अधिक युपीआय’ व्यवहारांची नोंदणी झाली. हे प्रमाण गेल्या ३ वर्षांतील व्यवहारांच्या ८ पट आणि गेल्या ४ वर्षांतील आर्थिक व्यवहारांच्या ५० पट आहेत. देशातील सर्व क्षेत्रांमध्ये आणि लोकसंख्येच्या सर्व घटकांमध्ये रूपे डेबिट कार्ड तसेच भीम युपीआय प्रणालीच्या माध्यमातून कमी – मूल्याच्या डिजिटल व्यवहार पद्धतींना चालना देण्यासाठी तसेच बँकांना मजबूत डिजिटल भरणा परिसंस्था उभारण्यासाठी मदत करून सरकारच्या मदत अनुदान योजनेने डिजिटल व्यवहारांना चालना दिली असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने रूपे डेबिट कार्ड आणि कमी मूल्याच्या भीम युपीआय व्यवहारांना चालना मिळावी म्हणून विद्यमान आर्थिक वर्षात मदत योजनेची सुरुवात आहे. सरकारने सुरु केलेल्या विविध उपक्रमांचा परिणाम म्हणून, केली भारतातील डिजिटल व्यवहारांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला असून गेल्या चार आर्थिक वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणातून ते स्पष्ट होत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत, वार्षिक आधारावर यावर्षीही यूपीआय वापरणाऱ्या ॲपमध्ये फोनपे, गुगल पे आणि पेटीएम पेमेंट्स बँक ॲप या तीन ॲप्सने  बाजी मारली आहे. तर भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक व आयसीआयसीआय बँक या बँकांतून सर्वाधिक व्यवहार झाले आहेत.

हे सुद्धा वाचा : पथविक्रेत्यांना ‘मैं भी डिजिटल 4.0’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

Digital Rape : देशात पहिल्यांदाच ‘डिजीटल रेप’ प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

पालकांनो, मुलांना “ही” दोन कफ सिरप दिली तर, अनर्थ घडेल!

वर्षनिहाय डिजिटल व्यवहारांची आकडेवारी
वर्ष – व्यवहार (कोटीत)
२०१८-१९–२३२६.०२
२०१९-२०–३४००.२५
२०२०-२१–४३७४.४५
२०२१-२२–७१९७.६८

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी