33 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमहाराष्ट्रCM Eknath Shinde : मेट्रो चाचणीच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर साधला...

CM Eknath Shinde : मेट्रो चाचणीच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर साधला बाण

मुंबईतील मेट्रो - 3 च्या चाचणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला. परंतु यावेळी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून राजकीय फटकेबाजी सुद्धा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शब्दांचा हल्ला केला.

मुंबईतील मेट्रो – 3 च्या चाचणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला. परंतु यावेळी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून राजकीय फटकेबाजी सुद्धा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शब्दांचा हल्ला केला. मेट्रो प्रकल्पामुळे हवेतील प्रदूषण कमी होईल, त्याचसोबत राजकीय प्रदूषण सुद्धा कमी होईल, असा टोला विरोधकांना लगावला. तसेच मागील अडीच वर्षांबद्दल बोलणे टाळतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कामांचे देखील कौतुक केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये अनेकांचे विघ्न आले, असे देखील म्हंटले. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी गणरायाच्या आदल्या दिवशी मेट्रो – 3 च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्याचा योग साधल्याचे म्हणत त्यांचे कौतुक सुद्धा केले. या मेट्रो प्रकल्पामुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण देखील कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. वाहतूक कोंडीवरील रामबाण उपाय असलेला असा हा प्रकल्प असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, मेट्रो – 3 च्या प्रकल्पामुळे इतर सर्व प्रदूषणासहित राजकीय प्रदूषण देखील कमी होईल असा बाण विरोधक आणि खास करून उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता मारण्यात आला आहे. राज्यावरील विघ्ने विघ्नहर्त्याने आधीच दूर केलेली आहेत. पण आता फक्त अडीच वर्षे हातात आहेत, म्हणजेच कमी बॉलवर जास्त रन करायचे आहेत. एकाला पाच वर्षांचा अनुभव आहे, असे म्हणत विरोधकांसमोर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे आव्हान आहे असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

Mumbai Metro 3 : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुलाबा सिप्झ मेट्रो लाईन-3 ची यशस्वी चाचणी

Mumbai Railway Bridge : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाने धोकायदायक पुलांबाबत मुंबईकरांना केले आवाहन

Shiv Sena : उद्धव ठाकरे यांचा संजय राठोडांना धक्का !

एकच आधी विरोधकांना भारी पडत होता, परंतु आता मात्र दोघे आहेत. परंतु आम्ही राजकारण करणार नाही असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उशीरा का असेना पण लोकांच्या मनातील भाजप-शिवसेना युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. विकास करणारं, राज्याला विकासाच्या मार्गावर नेणारे सरकार आहे. आम्ही सुद्धा आव्हानांना तोंड देत हे सरकार स्थापन केले आहे, त्यामुळे अश्विनी भिडे यांनी आता आव्हानांची चिंता करू नये असे मुखमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी