28 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरराजकीयShiv Sena : उद्धव ठाकरे यांचा संजय राठोडांना धक्का !

Shiv Sena : उद्धव ठाकरे यांचा संजय राठोडांना धक्का !

शिवसेनाभवन येथे बंजारा समाजाचे प्रमुख नेते राजू नाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. यामुळे शिंदे गटात असलेले बंजारा समाजाचे संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेला राज्याच्या राजकारणात पडलेल्या खिंडारानंतर मोठा भूकंप घडला. शिवेसेनेमधून एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 40 आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. त्याचसोबत शिवसेनेच्या 12 खासदारांनी राज्यपालांना पत्र देत वेगळा गट निर्माण केला. परंतु असे असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून मात्र शिवसेनेची नव्याने बांधणी करण्यात येत आहे. तसेच जुने आणि कट्टर शिवसैनिक आम्ही आजही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहोत, हे दाखवून देताना दिसत आहेत. आज (ता. 30 ऑगस्ट) शिवसेनाभवन येथे बंजारा समाजाचे प्रमुख नेते राजू नाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. यामुळे शिंदे गटात असलेले बंजारा समाजाचे संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे.

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. परंतु आता उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाचा दुसरा मोठा नेता आपल्या गळाला लावला आहे. त्यामुळे बंजारा समाजाचे आमदार आणि भाजप-शिंदे सरकारमधील अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे.

आज बंजारा समाजाचे प्रमुख नेते राजू नाईक यांच्यासोबत बंजारा समाजातील कार्यकर्तेही शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी राजू नाईक यांनी संपूर्ण बंजारा समाज हा आजही शिवसेनेसोबत आहे, असे आश्वासन दिले. एकंदरीत समाजातील एखादा प्रमुख नेता जरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून जात असला तरी, त्या समाजाचे कार्यकर्ते मात्र आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचेच दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

Mumbai Railway Bridge : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाने धोकायदायक पुलांबाबत मुंबईकरांना केले आवाहन

Mumbai Metro 3 : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुलाबा सिप्झ मेट्रो लाईन-3 ची यशस्वी चाचणी

Lakshman Hake News : ‘शिवसेनेत गेलेले लक्ष्मण हाके सरकारी पदाचा मलिदा हडपताहेत, लवकर हकालपट्टी करा’

बंजारा समाजाचे नेते राजू नाईक यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना पोहरा देवीचे दर्शन घेण्यासाठी देखील आमंत्रित केले आहे. दरम्यान, संजय राठोड हे पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. परंतु या प्रकरणी त्यांना क्लीन चिट देण्यात आली. मात्र पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येला शिंदे गटातील मंत्री संजय राठोड हेच जबाबदार असल्याचे भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि महिला नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून आजही सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी