30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे यांना लोकांचे शिव्याशाप सोसवेना, फेसबुक पेजवरील कमेंट बॉक्स केला बंद

एकनाथ शिंदे यांना लोकांचे शिव्याशाप सोसवेना, फेसबुक पेजवरील कमेंट बॉक्स केला बंद

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर राज्यात जिकडे – तिकडे दुःखी चेहरे पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागले म्हणून शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत, तिसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून भाजप कार्यकर्ते वैतागले आहेत, शिवाय शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची देश भ्रमंती असे सगळेच विषय सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचे मुद्दे बनले आहेत. या चर्चेत चांगल्या प्रतिक्रिया येण्याऐवजी लोक शिव्या शाप अधिक देत असल्यामुळे कंटाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पेजवरील ‘कॉमेंट बॉक्स’ बंदच केला आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली गेली, त्यामुळे शिवसैनिकांसोबत सामान्य माणूस सुद्धा दुखावला गेला. बंडोबा गटाते नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले परंतु त्याचे कोणीच कौतुक केले नाही, त्याउलट संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून उमटल्या. सोशलमिडीयावरील कोणत्याही प्लॅटफाॅर्मला भेट दिली तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दांत सुरू असलेला भडीमार लगेचच पाहायला मिळतो.

Eknath Shinde Facebook Page

 

दरम्यान, भाजपप्रेमी एकनाथ शिंदे यांच्यासाठी भाजपचे कार्यकर्ते दोन दिवसांपर्यंत सोशल मिडीयावर खिंड लढवत होते, परंतु शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळू न दिल्याने सोशल मिडीयावरील भाजप कार्यकर्ते यांनी तात्काळ माघार घेतली. ठाणे आणि इतर ठिकाणी शिंदे भक्त असले तरीही त्यांची संख्या तुरळकच पाहायला मिळत आहे त्यामुळे ही आभासी लढाई लढणार कोण असा प्रश्न निर्माण झाला.

या संपुर्ण पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अभिनंदन करण्याऐवजी शिव्याशाप कमेंट बाॅक्समध्ये आदळू लागल्या त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी फेसबुक पेजवरील कॉमेंट बॉक्स बंदच केला आहे. शिंदे यांनी टाकलेले मेसेज लोकांना वाचता येतात. पण त्यावर लोकांना प्रतिक्रिया व्यक्त करण्याची सुविधा शिंदे यांनी बंद करून टाकली आहे.

एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे लोकांच्या भावना त्यांनी ऐकून घ्यायला हव्यात. भल्या त्या भावना वाईट असोत किंवा चांगल्या, पण मुख्यमंत्री या नात्याने त्या भावना त्यांनी जाणून घ्यायला हव्यात. कॉमेंट बॉक्स बंद करणे म्हणजे लोकांपासून तोंड लपविण्याचा प्रकार आहे, अशा भावना काही लोकांनी व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा…

लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, शंकरराव गडाख यांना पुन्हा ‘जीव मुठीत घेऊन’ पवित्र सभागृहात यावे लागणार…

चित्रा वाघ यांची भाषा बदलली

प्राजू कुठे आहेस ?..काय धुकं…काय पाऊस…काय डोंगर… लय मज्जा..हाय !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी