‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काल म्हणजेच 17 मार्चला एल्विश यादवला (Elvish Yadav) नोएडा पोलिसांनी सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणात अटक केली होती. आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सापांच्या विषाची तस्करी केल्याची कबुली एल्विश यादवने दिली आहे. एल्विश यादवला ((Elvish Yadav) ) नोएडा पोलिसांनी अटक केली असून त्याला ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सापाचे विष मागवल्याची कबुली दिली आहे. त्याच्या या कबुली जबाबानंतर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र, याबाबत पोलिस आणि एल्विशच्या(Elvish Yadav) टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. युट्यूबर विरुद्ध आयपीसी, वन्यजीव संरक्षण कायदा आणि NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एल्विशने (Elvish Yadav) नोएडा पोलिसांना खुले आव्हान दिले होते. जर नोएडा पोलिसांनी आरोप सिद्ध केले तर कपडे उघडून नाचू, असे त्याने म्हटले होते. आता तो पोलिसांच्या तावडीत अडकला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस 8, 20, 27, 27 अ, 29, 30, 32 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोषी आढळल्यास 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. दंडाचीही तरतूद आहे.
यूट्युबर एल्विश यादवला पोलिसांकडून अटक; काय आहे प्रकरण?
एल्विश यादव (Elvish Yadav) हा नेहमीच चर्चेत असतो. कधी सापाच्या विषाच्या प्रकरणामुळे, कधी मॅक्सटर्नला मारहाण केल्यामुळे तर कधी रेस्टॉरंटमधील व्यक्तीवर हल्ला केल्यामुळे तो नेहमी चर्चेत राहिला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी एनजीओ पीएफए (मेनका गांधींची संस्था पीपल फॉर ॲनिमल्स) चे प्राणी कल्याण अधिकारी गौरव गुप्ता यांनी एल्विश यादवविरोधात (Elvish Yadav) नोएडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. एफआयआरमध्ये असे लिहिले आहे की एल्विशला दिल्ली एनसीआरमधील फार्म हाऊसमध्ये जिवंत सापांसह व्हिडिओ शूट केले गेले.
सिद्धू मुसेवालाच्या आईनं दिला मुलाला जन्म; पाहा बाळाचा पहिला फोटो
वनविभागाने सापांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते. 5 नागांच्या विषाच्या ग्रंथी काढण्यात आल्याचे समोर आले आहे. उर्वरित 4 साप विषारी नव्हते. चाचणीनंतर या सापांना जंगलात सोडण्यात आले.
मात्र, एल्विशने या संपूर्ण प्रकरणात स्वत:ला निर्दोष घोषित केले आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. माझ्याबद्दल जे काही बोलले जात आहे त्यात तथ्य नाही. आरोप करून माझे नाव खराब करू नका.
मी यूपी पोलिस आणि माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करू इच्छितो की या प्रकरणात माझ्यावरील आरोपांपैकी 1% देखील सिद्ध झाले तर मी जबाबदारी घेण्यास तयार आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की कृपया कोणत्याही पुराव्याशिवाय माझे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. माझा त्याच्याशी अजिबात संबंध नाही. असं एल्विशने म्हटलं होतं.