32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रसाताऱ्यातील हरणाई कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद

साताऱ्यातील हरणाई कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद

टीम लय भारी 

द्राक्षांच्या घडापासून ते ऊसाच्या पेरापर्यंत लावण,संगोपन आणि संरक्षण यांची इंत्यभूत माहिती देणारे प्रदर्शन सातारा येथे पार पडले. हरणाई सहकारी सूत गिरणी लि,येवळी यांनी आयोजित केलेल्या हरणाई कृषी २०२२ या प्रदर्शन सोहळ्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. हे प्रदर्शन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आले होते. संपूर्ण शेती विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी साताऱ्यात वडूज,माण खटाव भागातील हे पहिलेच कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे शुभारंभ साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

हरणाई कृषी २०२२ या प्रदर्शनाचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज येथील एसटी डेपो मैदान येथे १० मार्च ते १४ मार्च २०२२ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजताच्या सुमारास आयोजन करण्यात आले होते. याप्रदर्शनला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून, अनेकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

प्रदर्शनात ‘या’ गोष्टींचे मार्गदर्शन…

या हरणाई कृषी २०२२ या प्रदर्शनास शेतीशी निगडीत विविध योजनांच्या माहितीपासून औषधे,खते,बि-बियाणांपर्यंत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय सिंचन प्रकल्पांपासून ट्रॅक्टर औजारापर्यंतचे मार्गदर्शन आणि विविध विषयांवर आधारित चर्चासत्र आणि मार्गदर्शनापासून मनोरंजनही या प्रदर्शनात करण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी