28 C
Mumbai
Friday, July 26, 2024
Homeमहाराष्ट्रदेशात हजारो कोटींचे बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडींग रॅकेट; किसान आर्मी व वॉटर आर्मीची...

देशात हजारो कोटींचे बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडींग रॅकेट; किसान आर्मी व वॉटर आर्मीची कारवाईची मागणी

आरबीआयचे निर्देश, फेमा व इतर कायद्याचे उघडपणे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या लोकांची फसवणूक करून सोलापूर, पुणे, नागपूर, मुंबई, सातारा आदी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह देशातील गुजरात, कर्नाटक, राजस्थान, ओरिसा, कर्नाटक आदी अनेक राज्यात सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर फॉरेक्स (forex)ट्रेडींग रॅकेटवर तात्काळ कारवाई करा, या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या देशातील व परदेशातील दोषी व्यक्तीवर कारवाईसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी तत्काळ एक विशेष कृती दल स्थापून मोहीम तत्काळ राबवा आणि या सर्व बेकायदेशीर प्रकारात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदाराची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक त्यांना तत्काळ परत करा, अशी मागणी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी ईडी व पोलिसांकडे केली.

3 फेब्रुवारी 2022 रोजी आरबीआयने बेकायदा इटिपीवरून ट्रेडींग करू नका अन्यथा फेमा कायद्यांतर्गत संबंधितावर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा दिला होता. तरीही सोलापूर, पुणे, मुंबई, नागपूर,सातारा, विजापूर आदी जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात व देशात अनेक राज्यात कोट्यावधी रुपयांचे बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडींग चालू आहे. फसवणूक करणारे लोक गुंतवणूकदारांना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला तर आम्ही तुमची गुंतवणूक परत करणार नाही अशी धमकी देत असल्याने हे गुंतवणूकदार सैरभैर झाले आहेत.

हा सर्व प्रकार अत्यंत बेकायदेशीर असून या घोटाळ्याची व्याप्ती कोट्यावधी रुपयांची असू शकते. महत्त्वाचे म्हणजे हा सर्व प्रकार मला थेट राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर वाटत आहे. यासाठी हे पत्र मी जबाबदार यंत्रणा म्हणून ईडीला व राज्य पोलिस विभागाला अवगत करण्यासाठी सादर केल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

‘धर्मवीर २’ सिनेमा हिंदीतही यायला हवा’

मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याचंं कमबॅक; गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल

‘छगन भुजबळांनी हॉटेल जाळलं, पोलिसांनी एकमेकांवर हल्ले केले’

यातील फसवणूक करणारी मंडळी काही आपल्या देशात तर काही परदेशात आहेत. या सर्वांचा हा बेकायदेशीर कारभार एवढा उघडपणे कसा चालू आहे याचे आश्चर्य वाटत आहे. भारतात ईडी, पोलीस आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा यासारख्या यंत्रणा असताना एवढ्या मोठ्या उघड बेकायदेशीर कारभारावर सनियंत्रण कसे नाही हाही प्रश्न आहे. यातून देशातील नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक तर होत आहेच, त्याचबरोबर भारतातील पैसा बेकायदेशीरित्या परदेशात जात असल्याने राष्ट्रीय सुरक्षेतेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी