32 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीय'छगन भुजबळांनी हॉटेल जाळलं, पोलिसांनी एकमेकांवर हल्ले केले'

‘छगन भुजबळांनी हॉटेल जाळलं, पोलिसांनी एकमेकांवर हल्ले केले’

माझ्यावर हल्ले झाले त्यापेक्षा पोलिसांवर हल्ले झाले, हे महत्वाचे आहे. महिला पोलीस जखमी झाल्या. सध्या पोलीस हतबल झाले आहे. कारण जखमी झाल्यावर कारवाई पोलिसांवरच करण्यात आली. यामुळे राज्यात पोलीसच सुरक्षित असतील तर इतरांचे काय? यामुळे आता पोलिसांना विश्वास देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचे काम करा, असे पोलिसांना सांगणे गरजेचे आहे. बीडमध्ये पोलिसांवर हल्ला कसा झाला, हे तपासण्याची गरज आहे. जनतेपुढे पहिली बाजू आली नाही. त्याला पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्री जबाबदार आहे. असा आरोप राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे येत्या काळात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ यांच्यात वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहे. बीडमध्ये आजी आणि माजी आमदार यांची घरे पेटवून देण्यात आली होती. त्यानंतर भुजबळ राज्यात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. जालनामधील ओबीसी समाजाच्या सभेत बोलताना भुजबळ यांनी मराठा आंदोलकांमुळे बीड पेटले. नियोजनबद्ध पद्धतीने हे हल्ले करण्यात आल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून भुजबळ आणि जरांगे-पाटील यांच्यात कलगीतुरा रंगायला लागला आहे.

मराठा आरक्षण देण्यास आपला विरोध नाही. परंतु मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे ओबीसीतून मराठा समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. मराठा समाजास आरक्षण देण्यास माझा विरोध नाही. यासंदर्भात जेव्हा, जेव्हा ठराव आला, तेव्हा आपण हात वर केला आहे. तसेच शिंदे समितीचे काम संपले आहे. आता ही समिती बरखास्त करा, अशी मागणी  भुजबळ यांनी केली.

शिंदे समिती बरखास्त करण्याच्या मागणीसंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की, मराठवाडा हा निजामांकडे होता. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांनी मागणी केली की आम्ही मागसवर्गीय आहे. पण आमची कागदपत्रे तेलंगणात आहे. आता तेथील कागदपत्रे तपासली गेली. हा विषय फक्त मराठवाड्यापुरता होता. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हे काम करण्याची गरज नाही. आता राज्यात कुणबीसंदर्भात खोटे प्रमाणपत्र तयार केले जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. यामुळे शिंदे समितीचे काम आता संपले आहे. समिती बरखास्त करण्यात यावी.

आपल्यावर हल्ले होत आहे? यावेळी छगन भुजबळ कुत्सितपणे म्हणाले की, हॉटेल छगन भुजबळांनी जाळले, तर पोलिसांनी एकमेकांवर हल्ले केले, हे महत्वाचे आहे. महिला पोलीस जखमी झाल्या. सध्या पोलीस हातबल झाले आहे. कारण जखमी झाल्यावर कारवाई पोलिसांवरच करण्यात आली. यामुळे राज्यात पोलीसच सुरक्षित असतील तर इतरांचे काय? यामुळे आता पोलिसांना विश्वास देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचे काम करा, असे पोलिसांना सांगणे गरजेचे आहे. बीडमध्ये पोलिसांवर हल्ला कसा झाला, हे तपासण्याची गरज आहे. जनतेपुढे पहिली बाजू आली नाही. त्याला पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्री जबाबदार आहे.

हे सुद्धा वाचा

‘छगन भुजबळ यांची गाडी फोडणार’; स्वराज्य संघटनेचा इशारा
जालना औद्योगिक वसाहत केंद्रात जीएसटी पथकाची धाड

ठाण्यात आज समतेचा जयघोष; ‘सत्यशोधक दिंडी’चे आयोजन

संभाजी महाराज यांच्यासंदर्भात आपणास मोठा आदर आहे. त्यांचा पूर्ण महाराष्ट्र आहे. एखाद्या घटकाकडे त्यांनी पाहू नये, अशी आपली हात जोडून त्यांना विनंती आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी