27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयबीडमधील सभेत दिपक केसरकरांचा शिक्षिकेवर संताप म्हणाले; 'जरा श्रद्धा सबुरी ठेवा'

बीडमधील सभेत दिपक केसरकरांचा शिक्षिकेवर संताप म्हणाले; ‘जरा श्रद्धा सबुरी ठेवा’

राज्यात एका बाजूला मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. तर दुसरीकडे सरकारी पदभरतीवरून विद्यार्थ्यांचा संताप वाढत चालला असून संयम सुटत आहे. राज्यात परीक्षा होऊन काही दिवस झाले असून अजूनही निकालाचा तपास नाही. रात्रीचा दिवस करणारे अभ्यासू मुलं निकाल कधी लागणार ही आशा घेऊन जगत आहेत. भरतीच्या परीक्षा जुलै ते सप्टेंबर महिन्यात झाल्या आहेत. पण निकाल लागला नसल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. दरम्यान, बीडच्या सभेत शिक्षणमंत्री दिपक केसरकरांना (Deepak kesarkar) शिक्षिकेनं शिक्षक भरतीबाबत विचारलं असता दिपक केसरकरांनी संताप व्यक्त केला आहे.

अनेक महिन्यांपासून विद्यार्थी शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र यावर अजूनही सरकार ठोस पाऊल उचलत नाही. यामुळे बीडच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते, मात्र त्याऐवजी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि शिक्षणमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते. यावेळी एका भावी महिला शिक्षिकेनं केसरकरांना शिक्षक भरतीविषयी विचारले असता दिपक केसरकर महिलेवर संतापले आहेत. केसरकर महिलेला शिस्त लावा तुम्ही या सरकारी नोकरीत टिकणार नाही. जरा श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याबाबत सांगत असून त्यांनी भावी शिक्षिकेवर संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा

‘धर्मवीर २’ सिनेमा हिंदीतही यायला हवा’

मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याचंं कमबॅक; गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल

‘छगन भुजबळांनी हॉटेल जाळलं, पोलिसांनी एकमेकांवर हल्ले केले’

काय म्हणाले केसरकर

महिला शिक्षिकने विचारलेल्या प्रश्नावर केसरकरांनी संताप व्यक्त केला आहे. महिला शिक्षिकेने केसरकरांना रखडलेल्या शिक्षक भरतीवरून प्रश्न विचारला असता, मी  तुम्हाला सांगतो जर बेशिस्त असाल तर सरकारी नोकरीत येऊ शकत नाही. तुम्ही कशा मुलांना शिकवणार आहात? असा प्रतिसवाल केसरकरांनी शिक्षिकेला केला आहे. साईट ओपन झाली असून भरती सुरू आहे. तुम्ही कशा आलात विचारायला मला. आजपर्यंत पाच वर्षात कुणी भरती केली? मी केली ना, असे केसरकरांनी आपले शिक्षक भरतीबाबतचे प्रश्न मांडायला आलेल्या महिलेला सुनावले आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस  शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केसकरांवर संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले आव्हाड?

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सत्तेशिवाय २ दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार ५ वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मुलींना “श्रध्दा आणि सबुरी” शिकवताय. प्रत्येकाला नोकरी ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची असते. तुम्हाला उत्तरं द्यावीच लागतील केसरकर साहेब. जनतेला उत्तर देणं हे तुमचं काम आहे. ही अरेरावीची भाषा तुमच्या घरात चालत असेल. पण महाराष्ट्राची जनता अशी दादागिरी खपवून घेणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी