26 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeमनोरंजन'धर्मवीर २' सिनेमा हिंदीतही यायला हवा'

‘धर्मवीर २’ सिनेमा हिंदीतही यायला हवा’

धर्मवीर (Dharmaveer) आनंद दिघेंच्या आयुष्यावर चित्रित केलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या सिनेमात आनंद दिघेंची (Anand Dighe) भूमिका मराठी अभिनेता प्रसाद ओक यांनी केली आहे. प्रसाद ओकच्या अभिनयाचे या भूमिकेसाठी कौतुक होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे प्रवीण विठ्ठल तरडेंनी केलं आहे. पुन्हा एकदा या चित्रपटाची आतुरता चाहत्यांना लागली आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागात आनंद दिघे आणि त्यांचे कार्य, याचसह एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पदाआधीचं जीवन दाखवण्यात आले होते, मात्र दुसऱ्या भागात काय दाखवलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Dharmaveer 2)

एकनाथ शिंदेंची भूमिका ही क्षितीज दाते साकारणार आहेत. ठाणे येथे आज चित्रपटाच्या चित्रिकरणाबाबत केवळ घोषणा केली असून चित्रपटाचा शुभारंभ झाला नाही. चित्रपटाच्या या भागात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचे स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या चाळीस आमदारांसह केलेला बंड, गुवाहटी आणि बंडामागचा खुलासा होणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान चित्रपटाच्या टीमचं आणि कलाकारंचं कौतुक एकनाथ शिंदेंनी केलं आहे.

हे ही वाचा

मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याचंं कमबॅक; गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल

‘छगन भुजबळांनी हॉटेल जाळलं, पोलिसांनी एकमेकांवर हल्ले केले’

‘छगन भुजबळ यांची गाडी फोडणार’; स्वराज्य संघटनेचा इशारा

एकनाथ शिंदेंकडून प्रसाद ओकचं कौतुक

एकनाथ शिंदेंनी प्रसाद ओकचं कौतुक करताना प्रसादला मानलं पाहिजे, प्रवीण बरोबर तु शोधून काढलं त्याला. दिघेसाहेबांची भूमिका साकारतोय. एकदा आंधारातून चालत आला आणि साक्षात मला दिघे साहेबांचा भास झाला. दिघे साहेब कसे बोलायचे, वागायचे, त्यांची स्टाईल अशा सर्व गोष्टी आत्मसात केल्या आहेत.

धर्मवीर सिनेमा हिंदीतही यायला हावा

येत्या काळात धर्मवीर सिनेमा हिंदीतही यायला हावा. हा चित्रपट केवळ महाराष्ट्रापुरताच हा सिनेमा राहू नये याची काळजी निर्मात्यांनी घ्यावी. काही जणांना सिन खटकले. काहीजण मधूनच उठून गेले मात्र आता कोणाला काहीही वाटो, कोणाला आवडो ना आवडो आपण फुल ऑथरिटी म्हणून धर्मवीरचा दुसरा भाग तयार करणार.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prerana Jangam (@preranajangam5)

तर या सिनेमाच्या चित्रिकरणाचा शुभारंभ हा येत्या नऊ डिसेंबरला होणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त हा सोमवारी ठाण्यात पार पडला आहे. कोलशेतला उभारलेल्या आनंद दिघेंच्या टेंभी नाका येथे आनंदाश्रमाच्या सेटमध्ये हा मुहूर्त सोहळा संपन्न झाला. चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते मंगेश देसाई,आनंद दिघेंची भूमिका साकरणारा प्रसाद ओक आणि एकनाथ शिंदेंची भूमिका साकरणारा अभिनेता क्षितीज दाते आणि मंत्री दादा भुसे उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी