32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रGram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल?

Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल?

16 जिल्ह्यांमध्ये 547 ग्रामपंचायतींचे मतदान पार पडले आहे, त्यातील 51 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत त्यामुळे उर्वरित जागांवर नेमकी कोणाची सत्ता येणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटासाठी ही लढाई जिंकणे महत्त्वाची आहे त्यामुळे आता नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

नव्या सरकारच्या नव्या नियमानुसार राज्यात ग्रामपंचायत निवडणुका थेट पद्धतीने पार पडल्या त्यामुळे त्याच्या निकालाची उत्सुरकता सगळ्यांनाच लागली आहे. या निवडणुकांचा आज निकाल लागणार असून निकालात ठाकरे की शिंदे यांपैकी कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये सदर निवडणुका पार पडल्या असून त्यातील एकूण 547 ग्रामपंचायतींचे मतदान रविवारी पार पडले. या सर्वच ग्रामपंचायतींची मतमोजणी आज होणार आहे. दरम्यान, 547 ग्रामपंचायतींपैकी 51 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाची ग्रामपंचायत निवडणूक थेट पद्धतीने घेण्याचा शिंदे गटाचा मानस पुर्ण झाल्याने यावेळी त्यांचीच सरशी होणार का पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीस आज सकाळी दहा पासून सुरुवात होणार आहे. यावेळी थेट पद्धतीने सरपंचपदासाठी निवड होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंच पदासाठी सदर निवडणुक घेण्यात आलेली आहे, त्यामुळे आज दुपारपर्यंत कोणत्या गावाला कोण कारभारी मिळणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली.

हे सुद्धा वाचा…

Jacqueline Fernandez-EOW probe: 200 करोडच्या घोटाळयाप्रकरणी दिल्ली पोलिस जॅकलिन फर्नांडिस पुन्हा चौकशी करणार

Vedanta-Foxconn Row: ‘महाराष्ट्र हा पाकिस्तान आहे का?’ आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Taiwan : सावधान ! ‘या’ देशाला पुन्हा त्सुनामीचा धोका

ग्रामपंचायत निवडणुका

नंदुरबार: शहादा- 74 , नंदुरबार- 75, धुळे: शिरपूर- 33, जळगाव: चोपडा- 11 व यावल- 02, बुलडाणा : जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 व लोणार- 02, अकोला: अकोट- 07 , बाळापूर- 01, वाशीम: कारंजा- 04, अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 व चांदुर रेल्वे- 01, यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरगाव- 11 व झरी जामणी- 08. नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, व देगलूर- 01

हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06, परभणी: जिंतूर- 01 , पालम- 04, नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 व नाशिक- 17, पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 , भोर- 02, अहमदनगर: अकोले- 45, लातूर: अहमदपूर- 01, सातारा: वाई-01 , सातारा- 08, कोल्हापूर: कागल- 01. एकूण: 608

16 जिल्ह्यांमध्ये 547 ग्रामपंचायतींचे मतदान पार पडले आहे, त्यातील 51 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत त्यामुळे उर्वरित जागांवर नेमकी कोणाची सत्ता येणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटासाठी ही लढाई जिंकणे महत्त्वाची आहे त्यामुळे आता नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी