30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeमनोरंजनJacqueline Fernandez-EOW probe: 200 करोडच्या घोटाळयाप्रकरणी दिल्ली पोलिस जॅकलिन फर्नांडिसची पुन्हा चौकशी...

Jacqueline Fernandez-EOW probe: 200 करोडच्या घोटाळयाप्रकरणी दिल्ली पोलिस जॅकलिन फर्नांडिसची पुन्हा चौकशी करणार

दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तीन समन्स धाडल्यानंतर, बुधवारी पहिल्यांदा जॅकलिन चौकशीसाठी हजर राहिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुकेश चंद्रशेखरने कथितपणे उकळलेल्या खंडणी प्रकरणाचा तपास करण्याबाबत तिची तब्बल 8 तास चौकशी केली.

हिन्दी चित्रपट क्षेत्रातील (Bollywood) आघाडीची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर  (Jacqueline Fernandez) काही महिन्यांपासून मोठे संकट ओढावले आहे. त्यामध्ये आणखी भर म्हणून दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police)  आर्थिक गुन्हे शाखेच्या (Economic Offense Wing) एका पथकाने तिची चौकशी करण्यासंदर्भात समन्स पाठविला आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) नामक भामटयाने कथितपणे उकळलेल्या खंडणी (Extortion) प्रकरणाचा तपास करण्याबाबत दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी 11 वाजता जॅकलिन फर्नांडिसला चौकशीसाठी पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तीन समन्स धाडल्यानंतर, बुधवारी पहिल्यांदा जॅकलिन चौकशीसाठी हजर राहिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुकेश चंद्रशेखरने कथितपणे उकळलेल्या खंडणी प्रकरणाचा तपास करण्याबाबत तिची तब्बल 8 तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान, जॅकलिन सोबत पिंकी ईरानी नामक महिला हजर होती. पिंकी ईरानीने जॅकलिन फर्नांडिसवर आणि सुकेश चंद्रशेखरची भेट घडवून आणली होती. त्या मोबदल्यात तिला मोठी रक्कम मिळाल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.

दिल्ली पोलिसांनी जेव्हा जॅकलिन फर्नांडिसची पहिल्‍यांदा चौकशी केली तेव्हा त्यांना विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी जॅकलिनला चौकशीसाठी सोमवारी पुन्हा बोलावून घेतले आहे.

ईडी (Enforcement Directorate) या केंद्रीय तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगप्रकरणात (Money Laundering) जॅकलिन फर्नांडिसला सहआरोपी म्हणून घोषित केले आहे. दिल्ली पोलिसांना जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करून हे पडताळून पाहायचे आहे की, सुकेश चंद्रशेखर या भामटयाने खंडणीचे जे बेकायदेशीर रॅकेट चालवले आहे त्यामध्ये ती कितपत भागीदार आहे.

हे सुद्धा वाचा –

Vedanta-Foxconn Row: ‘महाराष्ट्र हा पाकिस्तान आहे का?’ आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Jharkhand Maoist Leader Arrest: 15 लाखांचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्याला महाराष्ट्र ATS ने केली अटक

Virat Kohli Opener: ‘विराट कोहली टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय डावाची सुरूवात करू शकतो’

पोलिसांना प्राथमिक तपासानंतर असे लक्षात आले आहे की, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसवर भुरळ घालण्यासाठी अनेक महागडे ऐवज तिला भेटवस्तू स्वरूपात दिले. जॅकलिन फर्नांडिसवर आणि सुकेश चंद्रशेखर यांचे काही खाजगी छायाचित्रेसुद्धा सोशल मीडीयावर तूफान वायरल झाली आहेत. सुकेश चंद्रशेखरने मान्य केले आहे की, त्याचे जॅकलिन फर्नांडिसशी प्रेमसंबंध होते. परंतु जॅकलिन फर्नांडिसने सुकेश चंद्रशेखरने केलेल्या विधानाचे खंडन करत असे स्पष्ट आहे की, तिला सुकेश चंद्रशेखरच्या खऱ्या रूपाची कोणतीही कल्पना नव्हती आणि तिचा सुकेश चंद्रशेखरने चालवलेल्या खंडणी रॅकेटमध्ये कोणताही सहभाग नाही.

सुकेश चंद्रशेखर या भामटयावर देशातील वेगवेगळया तपास यंत्रणांनी तब्बल 30 गुन्हे नोंदविले आहेत. सुकेश चंद्रशेखरवर तो तिहार कारागृहात कैद असताना एका व्यापारीच्या पत्नीकडून पैसे उकळल्याचा महत्त्वाचा आरोप आहे.

जॅकलिन फर्नांडिस ही आगामी काळात सर्कस (Circus) व रामसेतु (Ramsetu) नामक मोठया हिन्दी ‍ चित्रपटांमध्ये झळकणार आहे. परंतु सततचा दिल्ली पोलिसांचा तपास तिच्या मागे लागल्यामुळे तिची हिन्दी ‍चित्रपटामधील कारकीर्द धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी