35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रST Bus Crises : 'लालपरी'ला लागली शिंदे सरकारची नजर, घेतला 'हा' मोठा...

ST Bus Crises : ‘लालपरी’ला लागली शिंदे सरकारची नजर, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राज्यात आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण आता लागोलाग येतील, लोकांची लगबग सुरू होईल परंतु याच पार्श्वभूमीवर एसटी कामगार पुन्हा संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यासाठी एसटी कामगार संघटनेकडून संपाबाबत चाचपणी सुरू झाली आहे.

बऱ्याच कालावधीनंतर मागण्या मान्य होणार या विश्वासाने एसटी कामगार पुन्हा आपल्या कामावर रुजू झाले, परंतु महाविकास आघाडीसरकारने केलेल्या घोषणा या कागदावरच राहणार अशी शंकेची पाल चुकचुकू लागली आहे कारण शिंदे सरकारने याबाबत वेगळाच निर्णय घेण्याचे ठरवले आहे. संपामुळे आधीच तोट्यात चालणारी लालपरी पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांनी संप केला तेव्हा त्यांची पगारवाढ करणार त्यासाठी पुढील चार वर्षे 360 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे ठाकरे सरकार कडून सांगण्यात आले होते, परंतु आता शिंदे सरकारने या निधीवर निर्बध आणल्याने एसटी महामंडळाची पुरती कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आणि एसटी महामंडळ विलिनीकरणाचा मुद्दा लावून धरला, अनेक महिने चाललेल्या या संपावर अखेर तोडगा काढत त्यावेळच्या ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करणार असल्याचे सांगितले त्यासाठी 360 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे एसटी कर्मचारी थोडा सुखावला आणि पुन्हा कामावर रुजू झाला मात्र या आश्वासनानंतर राज्यात सरकार बदलले आणि सगळी समीकरणेच बिघडली. नव्या सरकारने आधीच्या निर्णयांवर बंधने घातली त्यामुळे 360 कोटी रुपयांऐवजी 100 कोटींचा निधी एसटी महामंडळाला प्राप्त झाला. अगोदरच अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाच्या पुन्हा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल?

Jacqueline Fernandez-EOW probe: 200 करोडच्या घोटाळयाप्रकरणी दिल्ली पोलिस जॅकलिन फर्नांडिस पुन्हा चौकशी करणार

Vedanta-Foxconn Row: ‘महाराष्ट्र हा पाकिस्तान आहे का?’ आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

प्राप्त माहितीनुसार, प्रत्येक महिन्याचे एसटीचे उत्पन्न साधारण 450 कोटींच्या असते, त्यातील 650 कोटी रुपये संपुर्ण यंत्रण सुरळीत ठेवण्यासाठी खर्च होतात, कर्मचाऱ्यांचे वेतन 310 कोटी, डिझेलसाठी 250 कोटी आणि इतर गोष्टींसाठी अंदाजे 90 कोटींचा खर्च येतो. मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च होणाऱ्या रकमेचा आकडा मोठा आहे, त्यामुळे बाकीच्या खर्चाचे नियोजन करणार कसे असा प्रश्न पेचप्रसंग एसटी महामंडळाला पडला आहे. दरम्यान दिवाळीच्या सणाला कामगार बोनसची अपेक्षा करतात परंतु आभाळच फाटकं असल्याने ठिगळं तरी कुठे कुठे लावणार अशी काहीशी स्थिती महामंडळाची झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण आता लागोलाग येतील, लोकांची लगबग सुरू होईल परंतु याच पार्श्वभूमीवर एसटी कामगार पुन्हा संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यासाठी एसटी कामगार संघटनेकडून संपाबाबत चाचपणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एसटी कामगार संघटनेने थेट 34 मागण्या समोर ठेवत लाक्षणिक उपोषणाची नोटीस एसटी महामंडळाला दिली आहे त्यामुळे एसटी महामंडळ काय निर्णय घेणार, शिंदे सरकार यावर कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी