32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
HomeमुंबईVedanta-Foxconn Row: ‘महाराष्ट्र हा पाकिस्तान आहे का?’ आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर...

Vedanta-Foxconn Row: ‘महाराष्ट्र हा पाकिस्तान आहे का?’ आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

सदर प्रकल्प महाराष्ट्रात उभारला गेला असता तर महाराष्ट्रात एक लाख तरूणांना रोजगाराची संधी निर्माण झाली असती परंतु सध्या महाराष्ट्राच्या सत्तेत असलेल्या लोकांनी महाराष्ट्राच्या लाखो तरूणांना धोका दिल्याचे मत आदित्य ठाकरे व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावर  (Vedanta-Foxconn Row) भाष्य करताना ‘गुजरात हा काही पाकिस्तान नाही’ असे विधान केले होते. त्या विधानाचा समाचार घेताना शिवसेनेचे (Shivsena) युवा नेते आणि महाराष्ट्राचे पूर्व मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ‘जर गुजरात हा पाकिस्तान नाही, तर महाराष्ट्र हा पाकिस्तान आहे का? तुमच्या सरकारने या राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातमध्ये सहजपणे जाऊ दिला. महाराष्ट्राच्या युवकांनी काय गुन्हा केला आहे?’ असा प्रतिप्रश्न फडणवीसांना केला. महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉन नामक कंपनीचा सेमी-कंडक्टर बनविण्याचा 1.54 लाख कोटी रूपयांचा प्रकल्प गमावला. त्यानंतर वेदांता-फॉक्सकॉनने 13 सप्टेंबर रोजी गुजरात सरकारशी त्याप्रकल्पाबाबत सांमजस्य करार केला. वेदांता-फॉक्सकॉनचा सेमी-कंडक्टर बनविण्याचा हा प्रकल्प पुण्यात उभारण्यात येणार होता. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारण खूप तापले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला सरकारला धारेवर धरले आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी असा आरोप केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या दबावामुळे सध्याच्या महाराष्ट्रातील सरकारने वेदांता-फॉक्सकॉनचा महत्त्वपूर्ण प्रकल्प गुजरातमध्ये जाऊ दिला.

हया आरोपांवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे सरकार राज्यात स्थापन झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी स्वत: वेदांता-फॉक्सकॉनचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची भेट घेतली. परंतु त्यांच्याकडून मला सांगण्यात आले की, त्यांच्या कंपनीने सदर प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, शेजारील गुजारात राज्य हे काही पाकिस्तान नाही. त्या राज्याचे महाराष्ट्राशी बंधुत्वाचे नाते आहे. आपण एका स्पर्धात्मक युगात जगत आहोत. आम्हाला आमच्या राज्यासहीत गुजरात, कर्नाटक व इतर राज्यांनीही प्रगती करावी असे वाटते.

हे सुद्धा वाचा –

Jharkhand Maoist Leader Arrest: 15 लाखांचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्याला महाराष्ट्र ATS ने केली अटक

Nilu Phule : सुपरस्टार निळू फुले यांचा बायोपिक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर

Virat Kohli Opener: ‘विराट कोहली टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय डावाची सुरूवात करू शकतो’

फडणवीसांनी त्यांच्यापूर्वी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवर टीका करताना बोलले की, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्याकाळात महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या तुलनेने कमी परदेशी गुंतवणूक झाली याचे कारण सुद्धा त्यांनी स्पष्ट करावे.

हया संपूर्ण प्रकरणाबाबत आपली बाजू स्पष्ट करताना वेदांता-फॉक्सकॉनचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हे सुद्धा केले की, महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या नेत्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी संपूर्ण प्रयत्न केले परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो.

सदर प्रकल्प महाराष्ट्रात उभारला गेला असता तर महाराष्ट्रात एक लाख तरूणांना रोजगाराची संधी निर्माण झाली असती परंतु सध्या महाराष्ट्राच्या सत्तेत असलेल्या लोकांनी महाराष्ट्राच्या लाखो तरूणांना धोका दिल्याचे मत आदित्य ठाकरे व्यक्त केले आहे.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी