26 C
Mumbai
Thursday, February 29, 2024
Homeराजकीय'छगन भुजबळ यांची गाडी फोडणार'; स्वराज्य संघटनेचा इशारा

‘छगन भुजबळ यांची गाडी फोडणार’; स्वराज्य संघटनेचा इशारा

राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून चांगलेच वातावरण तापले आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपासून रान पेटलं आहे. मात्र आरोप-प्रत्यारोप सुरूच असून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी आहे. ओबीसी समाज आणि नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावून घेत नाहीत. गेल्या काही दिवासांपासून मराठा समाजाविरोधात छगन भुजबळ वक्तव्य करत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil)  भुजबळांवर टीका करत आहेत. यामुळे आता भुजबळांना स्वराज्य संघटनेनं गाडी फोडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्याला वेगळं वळण लागलं आहे

हे ही वाचा

ठाण्यात कंटेनरवर शिवसेना शाखा

जालना औद्योगिक वसाहत केंद्रात जीएसटी पथकाची धाड

राधाकृष्ण विखे पाटलांनी वाळू नियमनासाठी घेतली बैठक, तिथे वाळू चोरांच्या नेत्याला सन्मानाचे स्थान !

गाडी फोडण्याचा भुजबळांना इशारा 

आधी जालना आणि आता हिंगोली येथे ओबीसी नेते छगन भुजबळांनी ओबीसी एल्गार महासभा घेतल्या. या सभेत छगन भुजबळांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यापासून विरोध दर्शवला आहे. यावरून आता छगन भुजबळांना स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी गाडी फोडण्याचा इशारा दिला आहे. धनंजय जाधव म्हणाले की, वेळ पडली तर भुजबळांची गाडी इथेही फुटू शकते. ओबीसी नेत्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या आरक्षणाला नख लावू नये. छगन भुजबळ हे वारंवार वक्तव्य करत दोन्ही समाजात वाद लावत आहेत. त्यांनी वेळीच थांबावं, असं म्हणत स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान, स्वराज्य संघटनेच्या शासकीय विश्रामगृहावर जात घोषणाबाजी केल्यानंतर भुजबळांचे पुतणे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते समीर भुजबळ छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचले असता, स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेत शासकीय विश्रामगृहात जाऊन स्वराज्य संघटनेच्या आंदोलनाविषयी विचारलं असता मला याची काही माहीती नसल्याची प्रतिक्रीया दिली आहे.

सरकारने मराठा समाजाला तात्पुरता आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर भुजबळांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळवून देण्यासाठी विरोध केला. मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देणे म्हणजे ओबीसी समाजावर अन्याय करण्यासारखे असल्याचे छगन भुजबळ यांचे म्हणणं आहे. त्यांनी जालना आणि हिंगोली येथे सभा घेतली असून जरांगेंवरती टीका केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी