30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रVIDEO : गुजरातचा निकाल देशासाठी धोकादायक; लय भारीचे संपादक विक्रांत पाटील यांनी केलेले...

VIDEO : गुजरातचा निकाल देशासाठी धोकादायक; लय भारीचे संपादक विक्रांत पाटील यांनी केलेले विश्लेषण

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. अंतिम निकाल स्पष्ट व्हायला अजून काही कालावधी जावा लागेल. मात्र, हा निकाल देशासाठी आणि भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. विरोधी पक्षांची ताकद कमजोर होणे, देशाच्या दूरगामी राजकारणाला घातक आहे. याविषयी अन काही वेगळ्या मुद्यांना हात घालणारे हे लय भारीचे संपादक विक्रांत पाटील यांनी केलेले विश्लेषण…

यावेळी भाजपाने गुजरातमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कॉँग्रेस कमजोर झाला आहे. आपने त्यांची मते खाल्ली. सलग सातव्या वेळी गुजरातमध्ये भाजपचे सरकार स्थापन होत आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात कॉँग्रेस सत्तेवर येत आहे. अर्थातच कॉँग्रेस त्यामुळे जिवंत राहायला मदत होणार असली तरी देशातील राष्ट्रीय विरोधी पक्ष संपवू पाहणारी निवडणूक म्हणून गुजरातच्या निकालाकडे गांभीर्याने पाहायला हवे.

या निवडणुकीतून एक वेगळेच धार्मिक ध्रुवीकरणाचे मॉडेल उभे राहण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांचा धाक नसलेला सत्ताधारी पक्ष निरंकुश होणे, लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणारे ठरू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ब्रॅंड बळकट करणारा हा निकाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात उठू पाहणारे पक्षातील सर्व आवाज आता दाबून टाकेल.

खरेच आपमुळे भाजपाचा विजय झाला आहे का? हा प्रश्न आहेच. त्यात गोध्रानंतरच्या नरोडा दंगलीत जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या आरोपीची मुलगी विजयी होते. गॉडमदर जसोकाबेन यांचा मुलगा विजयी होतो. हा राजकारणात कुठला नवीन पॅटर्न येऊ घातला आहे? पाटीदार बहुल भागातून तीन वर्षे मजबूत गड असलेल्या कॉँग्रेसचा सफाया होतो. हार्दिक पटेलसारखी प्यादी पुढे त्या-त्या राज्यात वापरली जाऊ शकतात का? अशा अनेक मुद्द्यांना या व्हीडिओत स्पर्श करण्यात आला आहे.

खालील लिंकवर पाहा संबंधित व्हिडीओ :

गुजरात निवडणुकीचा निकाल देशासाठी धोकादायक
Gujrat Election Results Dangerous for Country Democracy Vikrant Patil

हे सुद्धा वाचा :

गुजरात : भाजप मोडणार सर्वाधिक जागांचा विक्रम, तर काँग्रेसचाही सर्वात कमी जागांचा विक्रम होणार!

गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर काय म्हणाले शरद पवार, उद्धव ठाकरे?

मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा लागेल; देवेंद्र फडणवीसांची गुजरातच्या निकालानंतर प्रतिक्रीया

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी