28 C
Mumbai
Saturday, February 17, 2024
Homeमहाराष्ट्रआता नवीन काय ते सायंकाळी छापेमारी संपल्यानंतर कळेल : हसन मुश्रीफ

आता नवीन काय ते सायंकाळी छापेमारी संपल्यानंतर कळेल : हसन मुश्रीफ

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या मालमत्तांवर सक्तवसूली संचलनालय (ED) ने बुधवारी पहाटे छापे टाकले. त्यानंतर प्रसार माध्यमामाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत मुश्रीफ म्हणाले, माझे जावई, मुलगी आणि काही नातेवाईकांच्या मालमत्तेवर ईडीने धाड घातली आहे. यावेळी ते म्हणाले आता नविन काय आहे ते माहिती नाही, चारवर्षांपूर्वी आमची चौकशी झाली आहे, आता नवीन काय आहे ते सायंकाळी छापेमारी संपल्यानंतर कळेल. मुलीच्या सासूला, सुना, नातवंड, त्यांना भयभीत करून त्रास देण्याचा प्रयत्न आहे, सत्ता आली तरी कारवाई करतात याचं विशेष वाटते म्हणत भाजपला टोला लगावला. (Hasan Mushrif reaction after ED raid)

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावर मी मानहानीचे दावे दाखल केले आहेत. सोमय्या जी तक्रार करत आहेत त्याला आधार नाही, बेनामी संपत्तीबाबतच्या दाव्यात न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. मात्र आता सत्ता येऊन देखील हे सर्व कशासाठी करत आहेत ते कळत नाही असे देखील मुश्रीफ म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hasan Mushrif (@hasanmushrif)

अजित पवार काय म्हणाले? 
दरम्यान ईडीच्या छापेमारीच्या मुद्द्यावरुन अजित पवार म्हणाले, केंद्रात आणि राज्यात कोणाचेही सरकार असले तरी द्वेशापोटी कारवाई करु नये, इनकम टॅक्स, ईडी, एनआयए, सीबीआय यांना घटनेने, कायद्याने देशातील कुठल्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच राज्य सरकारच्या सीआयडी, एसीबी किंवा पोलीस विभाग या सर्व यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब भवनमध्ये भरला उदय सामंत यांचा जनता दरबार!

Get out Ravi : तामिळनाडूत राज्यपालांविरोधात रान तापले

जोगेंद्र कवाडेंना रामदास आठवलेंचा विरोध !

मात्र, आत्ता जे घडतं आहे त्याला राजकीय रंग असल्याची शंका काहींच्या मनात उपस्थित होत आहे. ठाकरे गटाबरोबर असणाऱ्या आमदारांपैकी कोकणातील आमदार राजन साळवी, आमदार नितीन देशमुख आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर एसीबीच्या चौकशा लावण्यात आल्याचा असा आरोप अजित पवार यांनी केला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी