हरियाणातील फतेहाबादच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने 120 महिलांवर बलात्कार करणारा तांत्रिक जिलेबी बाबाला 14 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (Jilebi Baba Rape Women Harassment) दोषारोपपत्रातून सिद्ध झालेले जिलेबी बाबाचे कारनामे चक्रावून टाकणार आहेत. हरियाणात हे सेक्स स्कँडल गाजले होते. वासनेचा पुजारी असलेला जिलेबी बाबा हा अश्लील व्हिडिओ बनवून महिलांना ब्लॅकमेल करायचा.
बिल्लुराम उर्फ अमरपुरी नागा हे या जिलेबी बाबाचे खरे नाव. एकेकाळी खरोखरच रस्त्यावर जिलेबी विकणारा हा माणूस प्रसिद्ध बाबा कसा झाला, ती कहाणीही थक्क करणारी आहे. 120 सीडींमध्ये या जिलेबी बाबांचे रंगेल आणि अश्लील कारनामे कैद आहेत. या बाबाची संपूर्ण गुन्हेगारी कुंडली; त्याचा ड्रग्ज, वेश्याव्यवसाय आणि पॉर्नचा धंदा कल्पनेपलीकडील आहे. त्याने इतक्या महिलांना आपल्या जाळ्यात कसे ओढले, त्यानंतर त्याने हे घृणास्पद कृत्य कसे केले, ते आपण जाणून घेऊया …
फतेहाबादच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने तोहानाच्या या ढोंगी बाबाला 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याला 35 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याला आयपीसीच्या कलम 376 सी अंतर्गत 7-7 वर्षे, पोक्सो कायद्याखाली 14 वर्षे आणि आयटी कायदा 67 अंतर्गत 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या भोंदू बाबाला 2018 साली हरियानातील टोहना येथून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर महिलांना चहामध्ये नशेच्या गोळ्या पाजून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. अश्लील व्हिडिओ बनवून महिलांना ब्लॅकमेल केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता.

पंजाबच्या मानसा जिल्ह्यात राहणारा अमरवीर हा 20 वर्षांपूर्वी हरियानातील टोहना येथे आला होता. टोहना येथे आल्यावर त्याने नेहरू मार्केटमध्ये जिलेबीचा स्टॉल लावला. जिलेबीचा धंदा चांगला चालू लागल्यावर या अमरवीरने गजरेला वगैरे बनवायला सुरुवात केली. त्याने दुकानाला अमरवीर पंजाबी गिफ्ट्स असे नाव दिले. हा व्यवसाय 10 वर्षे चांगला चालला. यादरम्यान त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या कुटुंबात चार मुली आणि दोन मुले होते. पत्नीच्या मृत्यूनंतर पंजाबमधून आलेल्या एका एक तांत्रिकाने अमरवीरला तांत्रिक विदयेची माहिती दिली. त्यानंतर जवळपास दोन वर्षे हा अमरवीर टोहना येथून गायब होता. 2 वर्षांनी तो टोहणा येथे परतला आणि प्रभाग क्रमांक 19 मध्ये घर घेतले. तेथेच त्याने बाबा बालकनाथ यांच्या नावाने मंदिर बांधले. हा अमरवीर मुलांसह त्या मंदिर आणि शेजारील घरातच राहू लागला.
या नवीन घरताच या जिलेबी बाबाचा घाणेरडा खेळ सुरू झाला. अमरवीरने नाव बदलून अमरपुरी ठेवले. घर व मंदिराबाहेर लोकांचे दु:ख, त्रास दूर करण्यासाठी तांत्रिक विद्येचा फलक लावला. त्यांच्या तांत्रिक विद्येचे खेळ सुरू झाले आणि दुखी-कष्टी, समस्याग्रस्त लोकांची गर्दी जमू लागली. त्यातून या ढोंगी बाबांकडे भरपूर पैसाही येऊ लागला. परंतु तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रदीप कुमार यांच्या तक्रारीवरून टोहना शहर पोलिसांनी 19 जुलै 2018 रोजी या बाबाविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याचे वाईट दिवस सुरू झाले. एका खबऱ्याने प्रदीप कुमार यांना जिलेबी बाबा महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याची टीप देऊन त्याचा अश्लील व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला गेला. पोलिसांनी या बाबाला अटक केली तेव्हा त्याच्याजवळून 120 अशील व्हिडिओ, सीडी सापडल्या. त्यात हा बाबा वेगवेगळ्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवताना दिसत होता.

हे सुद्धा वाचा :
धक्कादायक! एका पुजाऱ्याने महिलेकडून पैसे उकळत केला सामुहिक बलात्कार
महिलांच्या सुरक्षेचे पेटंट घेतलेल्या चित्रा वाघ भंडारा बलात्कार प्रकरणी चिडीचूप
भांग, गांजा घेतल्यास बलात्कार, खून, दरोडे थांबतील, भाजप नेत्याचा अजब दावा
जिलेबी बाबाने चौकशीत पोलिसांना सांगितले की, तो त्याच्याजवळ येणाऱ्या महिलांना समस्या निवारणाचे आमिष दाखवायचा, सहानुभूतीतून त्यांच्याशी संबंध व जवळीक वाढवायचा. पुढे महिलांना चहा किंवा इतर पेय, प्रसादातून गुंगीचे, नशेचे औषध द्यायचा. कधी कधी तर तो त्यांना प्रसाद सांगून अफू द्यायचा. नंतर गुंगीतील महिलेसोबत अश्लील कृत्य करायचा. त्याचे तो मोबाईलवरून व्हिडिओ बनवायचा, नंतर या महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. बदनामीच्या भीतीमुळे महिला पुढे येत नव्हत्या. 13 ऑक्टोबर 2017 रोजी एका महिलेने तक्रार दिली होती. त्यानंतर 2018 मध्ये तत्कालीन प्रभारी प्रदीप कुमार यांना पुरावा मिळाला आणि गुन्हा दाखल करण्यात आला. टोहाणा शहर पोलिस ठाण्यात जिलेबी बाबाविरुद्ध भादंवि कलम 328, 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर घटनास्थळावरून चिमटे, राख, विभूती, नशेच्या गोळ्या, व्हीसीआर आदी साहित्य जप्त करण्यात आले.
जिलेबीबाबा घर आणि मंदिराला आश्रम म्हणायचा. त्याचे भक्तही जिलेबीबाबाचा आश्रम म्हणूनच त्या जागेचा उल्लेख करायचे. या बाबाने आश्रमात तळघरही बांधले होते. या बाबाची ‘रेप-रूम’ आश्रमाच्या तळघरातच होती. जिथे तो असहाय्य महिला, मुलींवर बलात्कार करून सीडी बनवून नंतर पीडितांना ब्लॅकमेल करायचा. तंत्र-मंत्राच्या नावाखाली तो मुलींवर अत्याचार करायचा. तो त्यांना शपथ घ्यायला लावायचा. या बाबाला संमोहनविद्यासुद्धा अवगत होती. महिलांना वंश करण्यासाठी तो भुताटकीचे नाटक करायचा. त्यानंतर त्यांना दारू पंजून किंवा गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करायचा.
या प्रकरणात, 6 पीडितांनी न्यायालयात हजर राहून बाबाच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश केला. त्यानंतर 10 जानेवारीला फतेहाबादच्या जलदगती न्यायालयाने तिन्ही पीडितांच्या जबाबाच्या आधारे निकाल दिला. न्यायालयाने बाबाला 14 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. शस्त्रास्त्र कायद्यात मात्र पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली गेली. न्यायालयाने शिक्षा सुनावली त्यावेळी जिलेबीबाबा कोर्टात धाय मोकलून रडला. तो न्यायाधीशांकडे दयेची भीक मागत राहिला. अटक झाली तेव्हा त्याचे वय 57 वर्षे होते. आज त्याचे वय सुमारे 61 वर्षे आहे.