28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रशिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर यंदा हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर यंदा हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यंदा शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023 हा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असल्याची माहिती, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Hindavi Swarajya Mahotsav organized at Shivneri Fort on the occasion of Shiv Jayanti)

महाराष्ट्र राज्याची अस्मिता आणि आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९३ वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटन प्रेमींचे मुख्य आकर्षण आहे. यात शिवनेरी, रायगड व सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले आहेत. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य ही भावना आणि आपले वैभव नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसंस्कृती व महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक बनविले असून त्याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी या उत्साहात सहभागी होतील असे नियोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे.


‘शिवकालीन गाव’ महोत्सवाचे प्रमुख आकर्षण
किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे इत्यादींचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी; खटला सात सदस्यांच्या खंडपीठासमोर जाणार?

बेकायदेशीर भंगाराच्या गोदामात सापडला शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला पुतळा

शिक्षकांचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; शिक्षकांमधूनच पदे भरण्याची मागणी

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले, पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांसह पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती लाभणार आहे.

तीन दिवस चालणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे –

दि. १८ फेब्रुवारी २०२३

सायं. ६:३० वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३ उदघाटन
सायं. ७ ते रात्री १० वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ कार्यक्रम

दि. १९ फेब्रुवारी २०२३

स. ९ ते ११ वा. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा
दु. ३ ते ५ वा. शिववंदना
सायं. ६:१५ ते ७ वा. महाआरती कार्यक्रम
सायं. ७ ते रात्री १० वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम

दि.२० फेब्रुवारी २०२३

सायं.७ ते रात्री १० वा. जाणता राजा कार्यक्रम

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी