29 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणाचा पेच : एकनाथ शिंदेंनी बोलविली १६ पक्षांची  बैठक, आज निर्णय...

मराठा आरक्षणाचा पेच : एकनाथ शिंदेंनी बोलविली १६ पक्षांची  बैठक, आज निर्णय अपेक्षित

मराठा आंदोलनाचा विषय दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. जालना येथे आंदोलनासाठी बसलेले मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी ७ वाजता राज्यातील १६ पक्ष, आमदार, खासदार, मंत्री यांची जंबो बैठक सह्याद्री अतिथीगृहात बोलवली आहे. या बैठकीला विविध विभागांचे सचिवही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काहीतरी निर्णय वा तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बैठकीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे, मंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी (पवार गट) आमदार जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शेकापचे आमदार जयंत पाटील, बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर, विधान परिषद शिक्षक आमदार कपिल पाटील, जनसुराज्यचे विनय कोरे, रासपचे आमदार महादेव जानकर, माजी मंत्री आमदार बच्चू कडू, मनसेचे आमदार राजू पाटील, आमदार रवी राणा, सीपीएमचे आमदार विनोद निकोले, संभाजीराजे छत्रपती, वंचितचे प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, आरपीआय (गवई)चे एम राजेंद्र गवई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई), तसेच अधिकारी वर्ग आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा 
IND vs PAK, Asia Cup 2023: विराट कोहलीची विराट शतकी खेळी; सर्वाधिक वेगाने 13 हजार धावांचा विक्रम
‘बार्टी’च्या महिला अधिकाऱ्याविरोधात मुंडण आंदोलन करुन संताप व्यक्त
जवानचा सिक्वेल येणार… ‘या’ अभिनेत्याने दिली माहिती
मराठा आरक्षण आंदोलन १५ दिवसांपासून चिघळू लागले आहे. जरांगे पाटील यांच्या या अंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला होता. हे आदेश मंत्रालयातून देण्यात आले होते असा आरोप शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी केला होता. सरकार त्यांच्या परीने आंदोलने शांत करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या या मागणीसाठी जरांगे पाटील ठाम आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी