29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणEknath Shinde cabinet Expansion : मंत्रिमंडळातून नितेश राणेंचा पत्ता कट, पण दीपक...

Eknath Shinde cabinet Expansion : मंत्रिमंडळातून नितेश राणेंचा पत्ता कट, पण दीपक केसरकरांना संधी

नितेश राणे यांना मंत्रीपद मिळेल अशी जोरदार चर्चा होती. याउलट दीपक केसरकर यांच्या मंत्रीपदाबद्दल काहीच चर्चा नव्हती. प्रत्यक्षात मात्र नेमके उलटेच झाल्याचे दिसून आले आहे.दीपक केसरकर यांना मंत्रीपद मिळाल्याने विद्यमान सरकारमध्ये केसरकर यांचे वजन वाढले आहे.

सिंधुदुर्गच्या राजकारणात नारायण राणे कुटुंबिय व दीपक केसरकर यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे. दोन्हीही गटातून एकमेकांवर सतत वार केले जातात. आतापर्यंत दोघेही परस्पर विरोधी भूमिका असलेल्या राजकीय पक्षांमध्ये कार्यरत होते. पण आता दोघेही सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत. तरीही या दोन्ही गटांतून एकमेकांवर आरोप केले जात असतात. नितेश राणे यांना मंत्रीपद (Eknath Shinde cabinet Expansion) मिळेल अशी जोरदार चर्चा होती. याउलट दीपक केसरकर यांच्या मंत्रीपदाबद्दल काहीच चर्चा नव्हती. प्रत्यक्षात मात्र नेमके उलटेच झाल्याचे दिसून आले आहे. दीपक केसरकर यांना मंत्रीपद मिळाल्याने विद्यमान सरकारमध्ये केसरकर यांचे वजन वाढले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद सुद्धा आता केसरकर यांनाच मिळण्याची चिन्हे आहेत.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde cabinet Expansion : वादग्रस्त अब्दुल सत्तार, संजय राठोड यांनाही मिळाली मंत्रीपदाची खूर्ची

एकनाथ शिंदे गटाची तातडीची बैठक,  मंत्रीमंडळ विस्ताराअगोदर नाराजीचा घोळ !

Pradeep Patwardhan passed away : ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

केसरकर यांना मिळाले कॅबिनेट मंत्रीपद
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या कोट्यातील दीपक केसरकर राज्यमंत्री होते. परंतु उद्धव ठाकरे सरकारमध्ये केसरकर यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ते नाराज होते. अशातच शिंदे यांनी बंडखोरी केली. थेट गुवाहाटीत दाखल होवून केसरकर यांनी शिंदे गटाची बाजू जोरदार लावून धरली होती. त्यामुळे त्यांना शिंदे गटाचे प्रवक्तेपद सुद्धा त्यांना मिळाले.

शिंदे गटाची बाजू सांभाळताना केसरकर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याविषयी अनेकदा सहानुभूती सुद्धा व्यक्त केली होती. केसरकर यांनी तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेवून राणे कुटुंबियांवर तोफ डागली होती. राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांची खोटी बदनामी केल्याचा आरोप केसरकर यांनी केला होता. त्यानंतर निलेश राणे यांनी केसरकर यांना वाहन चालकांची नोकरी देवू केली होती. तसे कुत्सित ट्विट निलेश राणे यांनी केले होते. पण प्रत्यक्षात मात्र केसरकर यांना मंत्रीपद मिळाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी