30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरव्हिडीओVIDEO : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरचा बाप्पा

VIDEO : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरचा बाप्पा

आज सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे (Ganpati Bappa) वाजत गाजत स्वागत करण्यात आले. त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा आनंद पसरलाय. आपल्या राज्यात आज सगळेकडे चैतन्याचे वातावरण आहे. कारण सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे घरामध्ये आगमन झालंय. घरोघरी गणपती बाप्पाचे स्वागत भक्तीमय वातावरणात आणि धुमधडाक्यात करण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांच्या मुंबई येथील घरी सालाबाद प्रमाणे मोठया उत्साहात गणपती बाप्पांचे आगमन झाले. गेल्या पन्नास वर्षांपासून अशोक चव्हाण यांच्या घरी बाप्पाची स्थापना केली जाते. या वर्षी देखील बाप्पाची विधीवत पूजा करण्यात आली. सर्वसामान्य नागरिक शेतकरी या सर्वांना सुख शांती मिळू दे, सगळयांवरची विघ्न दुर होऊ दे अशी प्रार्थना अशोक चव्हाण यांनी गणपती बाप्पाकडे केली. अशोक चव्हाण यांनी सहकुटुंब गणपतीची पूजा केली. यावेळी त्यांच्या घरी पाहूणे देखील आले होते.

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे उत्सवांवर बंदी होती. यावर्षी मात्र गणपती बाप्पांचे स्वागत एकदम धुमधडाक्यात सुरु आहे. लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सगळीकडे उत्साह ओसंडून वाहत आहे. सगळीकडे सजावट आणि आरास पाहायला मिळत आहे. त्यामुळे वातावरण कसे एकदम प्रसन्न आहे.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी