33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रव्यवसायिकांना दिलासा देणारी बातमी; एलपीजी सिलेंडरच्या दरात घट

व्यवसायिकांना दिलासा देणारी बातमी; एलपीजी सिलेंडरच्या दरात घट

दिवसेंदिवस दैनंदिन वापरात असलेल्या गोंष्टीमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. अशात व्यवसायिकांना दिलासा देणारी बातमी आहे. आज पासून एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यवसायिक सिलेंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. हे दर १ जूनपासून लागू होणार आहेत.

१९ किलोच्या व्यवसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत ८३.५० रूपयांनी कमी झाली आहे, तर घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता नव्या कपातीनंतर १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १,७७३ रुपयांवर आली आहे. मे महिन्यात ही किंमत १,८५६.५ रुपये प्रति सिलेंडर होती. हा सिलेंडर मुंबईत १७२५ रुपयांना उपलब्ध आहे. कोलकातामध्ये १९ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत १,८५६.५ रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

कर्नाटकात पाणी टंचाई; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे एकनाथ शिंदेंना पत्र

ग्रामपंचायत तशी चांगली, पण शौचालयाने अडली..

एसटी सेवेची 75 वर्षे; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची लाईफलाईन “लालपरी”

चेन्नईमध्ये हे सिलिंडर १,९३७ रुपयांना उपलब्ध आहे. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये होती, जी आजही त्याच दरावर आहे. राजस्थानची राजधानी जयपूरबद्दल सांगायचे तर, येथे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १७९६ रुपये आहे. सरकारी तेल कंपन्यांनीही विमान कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनीही जेट इंधनाच्या दरात कपात केली आहे. जेट इंधनाची किंमत ६६३२.२५/KL रुपयांनी कमी झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी