25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : राज्यपालांना हटवा; उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र बंदचा इशारा

Uddhav Thackeray : राज्यपालांना हटवा; उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र बंदचा इशारा

राज्यपाल हा निष्पक्ष असायला हवा, राज्यातील पेचप्रसंगांची त्यांनी सोडवणूक करायला हवी. पण आपले राज्यपाल मात्र काहीही बोलतात. पण आता राज्यपाल जे काही बोलतात ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. केंद्राने हे सँपल परत घेऊन जावे अन्यथा महाराष्ट्र इंगा दाखवेल असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

राज्यपाल हा निष्पक्ष असायला हवा, राज्यातील पेचप्रसंगांची त्यांनी सोडवणूक करायला हवी. पण आपले राज्यपाल मात्र काहीही बोलतात. पण आता राज्यपाल जे काही बोलतात ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. केंद्राने हे सँपल परत घेऊन जावे अन्यथा महाराष्ट्र इंगा दाखवेल असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात मिंधे सरकार आल्यापासून कुणीही यावे आणि टपलीमारून जावे अशी अवस्था असून महाराष्ट्राची अवहेलना सातत्त्याने सुरू असल्याचे सांगत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छ. शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत खरपूस समाचार घेतला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात मराठी लोकांचा अपमान केला, त्या आधी सावित्रीबाई फुले यांचा देखील त्यांनी अपमान केला होता. आता त्यांनी शिवरायांबद्द्ल वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपालांना हटवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं सांगत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचा इशाराही दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या पक्षाची केंद्रात सत्ता असते त्यांच्या विचारसरणीचा माणूस राज्यपाल म्हणून राज्यांमध्ये नेमला जातो. मात्र राज्यपालांची नेमणूक करताना त्या व्यक्तीची कुवत आणि पात्रता लक्षात घेतली जात नाही, ज्या व्यक्तीला वृद्धाश्रमातही जागा नसते त्यांना राज्यपाल का नेमले जाते असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
हे सुद्धा वाचा :

Mantralaya : चौकशीच्या फेऱ्यातून निसटण्यासाठी मंत्र्यांच्या खासगी सचिवाचा आटापीटा; मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये उताविळपणाची जोरदार चर्चा

विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा.. प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

Anil Gote : देवेंद्र फडणविसांना पाहून सरड्यानेही रंग बदलणे दिले सोडून’

राज्यपाल कोश्यारींनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर भाजप घाला घालण्याचा प्रयत्न करत आहे, हा त्यांच्या पक्षाचा राजकीय अजेंडा आहे की काय असा प्रश्न पडत असल्याचे देखील यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यपालांना हटवले नाही तर अशा महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात सर्वांनी एकत्र यायला हवे असे आवाहन करत, शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंद करु आणि महाराष्ट्र लेचापेच्यांचा नाही हे केंद्राला दाखवून देऊ असे सांगत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी