29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Politics : '...नाहीतर राज्यातला ऑक्सिजन गुजरातला गेला असता'

Maharashtra Politics : ‘…नाहीतर राज्यातला ऑक्सिजन गुजरातला गेला असता’

नव्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील महत्त्वकांक्षी प्रकल्प भराभर गुजरातचा रस्ता पकडू लागले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणाला चांगलाच फटका बसला आहे.

राज्यातील राजकीय वातावरण सध्या वेगवेगळ्या कारणावरून चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सत्तांतराच्या नाट्यानंतर आरोप – प्रत्यारोपाचे खेळ सुरूच असले तरी आता मात्र एक वाद आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणचे नव्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील महत्त्वकांक्षी प्रकल्प भराभर गुजरातचा रस्ता पकडू लागले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणाला चांगलाच फटका बसला आहे. रोजगाराच्या लाखो संधी यामध्ये राज्याने गमावल्या, विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उमटला, नव्या विकासाच्या वाटा पुन्हा धुळीत हरवल्या, त्यामुळेच विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत आता रान उठवायला सुरवात केली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी नेत्या सक्षना सलगर (Sakshna Salgar)  यांनी सुद्दा सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

सुरवातीला वेदांत फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेला आणि महाराष्ट्रात सर्वसामान्य आणि विरोधकांमध्ये एकच संतापाची लाट उसळली. यावर वादावादीचे पडसाद कमी होणार तेवढ्यात टाटा एअरबस सारखा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुद्धा गुजरातला गेला त्यामुळे तर हा वाद आणखी चिघळला. त्यावर विरोधी गटातील अनेक नेत्यांनी आवाज उठवत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रकल्पांपेक्षा सुद्धा मोठे राज्याला मिळतील असे अमिष दाखवून सत्ताधारी सर्वसामान्यांना सुखावण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे सुद्धा वाचा…

Rambha Car Accident : सलमान खानच्या अभिनेत्रीचा भीषण कार अपघात

ShivSena : मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यास आठ दिवसांत राजीनामा देईन; आदित्य ठाकरे यांना सत्तारांचे आव्हान

Gujarat Bridge Collapsed : रक्ताचा सडा बघायला येणाऱ्या मोदींसाठी रुग्णालयात रंगरंगोटी! काँग्रेस आक्रमक

दरम्यान, हाच मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी नेत्या सक्षना सलगर यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी यावरून सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ट्विटमध्ये सलगर लिहितात, बरं झालं covid काळात राज्याची जवाबदारी मविआ कडे होती. नाहीतर राज्यातला ऑक्सिजन गुजरात ला गेला असता आणि मंत्री महोदयांनी जनतेला सांगितलं असतं, “मोदीजी राज्याला यापेक्षा मोठा सिलेंडर देणार आहेत.” असे म्हणून त्यांनी सध्याच्या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधून घेतले आहे.

सोबतच आवर्जून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा टॅग केले आहे आणि महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेलेला वेदांत फाॅक्सकाॅन आणि टाटा एअर बस या प्रोजेक्ट्सचे हॅशटॅग वापरले आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत चांगल्या वाईट पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ज्या पद्धतीने सक्षना सलगर यांनी हा मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून लावून धरला अगदी त्याच पद्धतीने विरोधी गटातील अनेकांकडून सुद्धा हा सूर आळवण्यात आला. त्यामुळे दिवसेंदिवस चिघळत चाललेल्या या विषयाला कोण कशापद्धतीने न्याय देणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी