28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रmanipur:मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात मणिपूर मधून का

manipur:मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात मणिपूर मधून का

गेले 11 महिन्यापासून मणिपूर जळत आहे. मणिपूर मध्ये काय चाललंय याचा थांगपत्ताही संपूर्ण देशाला माहित नव्हता. सोशल मीडियावर एका महिलेवर बलात्कार करून गोळीबार करण्यात आला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यायालयाने सरकारला फटकारले. त्यानंतर दोषीवर कारवाई करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत मणिपूर अशांत आहे.

मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय (manipur,mumbai,bhaat jodo yatra) यात्रेची सुरुवात मणिपूर मधून का

काँग्रेसचे नेते राहुल गांधी(rahul gandhi) यांनी नुकताच भारत जोडो न्यायात्राचा समारोप मुंबई मधून केला.याची सुरुवात मणिपूर मधून झाली.तब्बल 6700 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी मुंबईत देशातील प्रमुख नेत्यांना सोबत घेत यात्रेचा समारोप केला. यात्रेदरम्यान प्रवासात आलेल्या नागरिकांच्या समस्या त्यांनी सभेमध्ये बोलून दाखवल्या. या यात्रेची सुरुवात मणिपूरम मधून का झाली हे आपण जाणून घेऊया.

‘फडणवीसांचे ‘ते’ कर्तृत्व म्हणजे राजकीय परंपरेला काळिमा फासणारी बाब’

आजतागायत आहे मणीपुर शांत

गेले 11 महिन्यापासून मणिपूर जळत आहे. मणिपूर मध्ये काय चाललंय याचा थांगपत्ताही संपूर्ण देशाला माहित नव्हता. सोशल मीडियावर एका महिलेवर बलात्कार करून गोळीबार करण्यात आला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यायालयाने सरकारला फटकारले. त्यानंतर दोषीवर कारवाई करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत मणिपूर अशांत आहे.

ईडी, सीबीआयचा गैरवापर करीत विरोधकांना नेस्तनाबूत केले : सरदेसाई

नरेंद्र मोदी (nareandr modi) का जात नाहीत माणिपुरात
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (narenadr modi) संपूर्ण जगाचा दौरा केला .मात्र देशातीलच एक भाग असलेल्या मणिपूरला मात्र ते एकदाही गेलेले नाहीत. मोदी यांच्या रूपाने जगात जवळीकता साधली जात असल्याचे भाजपच्या नेत्याकडून सांगितले जात.मात्र देशातीलच एक भाग म्हणजे मणिपूर हे देशापासून दूर जात असल्याचि खंत एकाही भाजपच्या नेत्यांमध्ये का नसावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मैत्री आणि कुकी यामध्ये असलेला वाद अद्याप मिटलेला नाही.मणिपूरची संख्या तीस ते पस्तीस लाख इतकी आहे. शासकीय आकडेवारी मधून आतापर्यंत 200 जण यामध्ये मारले गेले असल्याचे सांगण्यात आले. गावच्या गाव विस्थापित झाले असून आपल्याला सुरक्षित ठिकाणी जागा शोधत आहेत. तरुणाचे झुंड ते झुंड बंदूक घेऊन बाहेर पडत आहेत.अल्पसंख्याक समाजावर गोळीबार सुरू आहे.सामूहिक बलात्कार करून महिलांचि हत्यासुद्धा केली जात आहे.

सिद्धू मुसेवालाच्या आईनं दिला मुलाला जन्म; पाहा बाळाचा पहिला फोटो

म्हणुन केले जाते दुर्लक्ष

हे सर्व सुरू असताना सरकार याकडे दुर्लक्ष करते. सरकारला बहुतेक मताची काळजी आहे ती मते आपल्यापासून दूर जाऊ नयेत म्हणून ते त्यांना रोखू शकत नाहीत असं विरोधकांच्यामधून टीका केली जात आहे. मताच्या जोगव्यासाठी एखाद्या राज्यात गोळीबार होणं, सामूहिक बलात्कार करून महिलांची हत्या करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे.अन्यथा मणिपूर मधून ही हिंसा महाराष्ट्रात सुद्धा पोहोचायला वेळ लागणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवार आणि त्यांचे नेते ज्यावेळी तुमच्या दारात येतील तेव्हा हा मणिपूरचा प्रश्न विचारायला तुम्ही विसरू नका.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी